रणंजय सिंह मंचावर कोसळताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मंदिर समितीच्या सदस्यांनी त्यांना तातडीनं छपरा येथील रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच रणंजय सिंह यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
निवृत्त प्राध्यापक रणंजय सिंह भाविकांना संबोधित करत असताना तिथे उपस्थित असलेले अनेक जण चित्रिकरण करत होते. त्यामुळे संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली. थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. रणंजय सिंह मंदिर समितीचे मुख्य सचिव होतेय. त्यांच्या निधनामुळे मंदिर व्यवस्थापनावर शोककळा पसरली. मारुती मानस मंदिराच्या स्थापनेपासून रणंजय सिंह मंदिराशी जोडलेले होते. मंदिराच्या उभारणीत त्यांनी मोलाचं योगदांन दिलं.
शनिवारी संध्याकाळी स्वामी रत्नेश्वर यांचं प्रवचन झाल्यानंतर प्रोफेसर साहेब उपस्थितांना संबोधित करत होते. बोलता बोलता अचानक त्यांचा आवाज क्षीण झाला. त्यांना बोलताना अडचण येऊ लागली. ते मंचावर कोसळले, अशी माहिती समितीच्या सदस्यांनी दिली. रणंजय सिंह यांना तातडीनं छपरा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचं सदस्यांनी सांगितलं.