मेलबर्न: भारतीय टीमच्या मिशन टी-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताचा दारुण पराभव केला होता. पाकिस्ताननं १० गडी राखून भारताला पराभूत केलं होतं. याच पराभवाचा बदला घेण्याची संधी आज भारताकडे आहे. मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियमवर सामना रंगेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी एक चाहता मेलबर्नला पोहोचला. त्याची निम्मी जर्सी भारताची, तर निम्मी पाकिस्तानची होती. त्याला याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर मी मूळचा भारताचा रहिवासी आहे. माझी पत्नी पाकिस्तानी आहे, असं उत्तर त्यानं दिलं. सामना पाहण्यासाठी अमेरिकेहून आल्याचं त्यानं सांगितलं. बायको पाकिस्तानी, मात्र दिल हिंदुस्तानी. पत्नीनं परवानगी दिल्यानंतरच ही जर्सी परिधान केली आहे. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी इथे पोहोचल्याचं तो पुढे म्हणाला.
बाबर आझमचा भारताला सावध राहण्याचा इशारा, म्हणाला सामन्यात काहीही होऊ शकतं…
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचा समावेश देशातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होते. या स्टेडियमची क्षमता जवळपास १ लाख प्रेक्षकांची आहे. सामन्याची सगळी तिकिटं विकली गेली आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक मेलबर्नला महामुकाबला पाहण्यासाठी पोहोचले आहेत.

मेलबर्नच्या आकाशात ढगांची दाटी आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे. मिशन टी-२० वर्ल्डकपमधला भारताचा पहिला सामना आज होत आहे. पाकिस्तानचादेखील हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मिशन वर्ल्डकपची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here