Rohit Sharma : रोहित शर्माला आजच्या सामन्यापूर्वी अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. रोहित यावेळी टॉससाठी मैदानात आला होता. रोहितने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहितच्या डोळ्यातून यावेळी अश्रू का वाहायला लागले, याचे कारणही आता समोर आले आहे. रोहितबाबत यावेळी मैदानात नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या…

रोहित शर्मा हा आतापर्यंत भारतासाठी बऱ्याचदा हिरो ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाटी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी निराशजनक झाली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत दुसऱ्या टी-२० वर्ल्डकप विजेतेपदासाठी सज्ज झालाय. दिवाळीच्या आधी रोहित शर्मा नेहमी मोठा धमाका करण्यासाठी ओळखला जातो. जेव्हा जेव्हा भारतीय संघ दिवाळीच्या वेळी मॅच खेळत असतो तेव्हा तेव्हा रोहित शर्मा हिरो ठरलाय. रोहित शर्माची वरील कामगिरी पाहता आज देखील चाहत्यांना त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल. टीम इंडियाची फलंदाजी मजबूत आहे. आघाडीपासून ते मधळ्या फळीपर्यंत सर्व फलंदाज स्फोटक खेळी करू शकतात. फक्त कौशल्य नाही तर अनुभव देखील आहे. त्यामुळे आता या सामन्यात रोहित नेमकं काय करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. आयसीसी टी-२० क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघात आतापर्यंत ११ लढती झाल्या असून भारताने ८ तर पाकिस्तानने ३ मॅच जिंकल्या आहेत. टी-२० वर्ल्डकपचा विचार केल्यास ६ पैकी ५ लढती भारताने तर १ लढत पाकिस्तानने जिंकली आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.