india vs pakistan t20 world cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानावर उतरताच रोहित शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. सलग आठ टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळण्याचा विक्रम रोहितच्या नावावर जमा झाला आहे. भारताकडून सलग आठ टी-२० विश्वचषक खेळणारा तो पहिला खेळाडू आहे.

 

rohit sharma
मेलबर्न: भारतीय टीमच्या मिशन टी-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताचा दारुण पराभव केला होता. पाकिस्ताननं १० गडी राखून भारताला पराभूत केलं होतं. याच पराभवाचा बदला घेण्याची संधी आज भारताकडे आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी फलंदाजांना वेसण घालण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानावर उतरताच रोहित शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. सलग आठ टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळण्याचा विक्रम रोहितच्या नावावर जमा झाला आहे. भारताकडून सलग आठ टी-२० विश्वचषक खेळणारा तो पहिला खेळाडू आहे. रोहित व्यतिरिक्त हा पराक्रम कोणालाच जमलेला नाही. २००७ पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. ती स्पर्धा भारतानं जिंकली होती. रोहित त्या संघाचा भाग होता.
अर्धी जर्सी भारताची, अर्धी पाकची! अमेरिकेहून मेलबर्नला पोहोचलेल्या भारतीय फॅननं असं का केलं?
यंदा ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगत आहे. ही आठवी विश्वचषक स्पर्धा आहे. सलग आठ विश्वचषक स्पर्धा खेळणारा रोहित शर्मा भारताचा पहिला खेळाडू आहे. रोहितशिवाय ही कामगिरी कोणालाच जमलेली नाही. ३५ वर्षांचा रोहित शर्मा टी-२० विश्वचषक स्पर्धात एकूण ३४ सामने खेळला आहे. यातील ३० सामन्यांत त्यानं फलंदाजी केली आहे. यापैकी ८ सामन्यांत तो नाबाद राहिला आहे. ३० सामन्यांत रोहितनं ८४७ धावा केल्या आहेत. ७९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. विश्वचषकात त्याच्या नावावर ८ अर्धशतकं आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here