इंदूरच्या आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पवनपुरी वसाहतीत वास्तव्यास असलेल्या राजा राम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानं दारुमध्ये ऍसिड टाकलं होतं. अधिक नशा व्हावी यासाठी राजा रामनं दारुत ऍसिड टाकून मिश्रण तयार केलं. हे मिश्रण तो प्यायला. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली.

 

indore man
इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये व्यसनाधीन तरुणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. वाढत्या व्यसनाधीनतेविरोधात इंदूर पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. मात्र यानंतरही व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या कमी होताना दिसत नाही.

इंदूरच्या आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पवनपुरी वसाहतीत वास्तव्यास असलेल्या राजा राम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानं दारुमध्ये ऍसिड टाकलं होतं. अधिक नशा व्हावी यासाठी राजा रामनं दारुत ऍसिड टाकून मिश्रण तयार केलं. हे मिश्रण तो प्यायला. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
आवाज क्षीण झाला, बोलता बोलता कोसळले; प्रवचनावेळी निवृत्त प्रोफेसरला हार्ट अटॅक, मंचावरच मृत्यू
राजा राम नावाच्या व्यक्तीनं नशा करण्याचा प्रयत्न केला. मात्र नशा चढत नसल्यानं त्यानं दारुमध्ये ऍसिड टाकलं. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. नातेवाईक त्याला घेऊन रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचं आझाद नगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी महेश तिवारी यांनी सांगितलं. राजा रामला दारु पिण्याचं व्यसन होतं. दारु प्यायल्यानंतर त्याला नशा न चढल्यानं त्यानं त्यात ऍसिड मिसळलं. ते मिश्रण प्यायल्यानं त्याचा जीव गेल्याची माहिती तिवारी यांनी दिली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here