या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने निर्धारित २० षटकांत ८ विकेट्स गमावत १५९ धावा चोपल्या. यावेळी पाकिस्तानकडून सहाव्या क्रमांकावर हैदर अली फलंदाजीला आला होता. यावेळी त्याला जास्त वेळ मैदानावर टिकता आले नाही.
सामना दरम्यान झालं असं की, हार्दिक पंड्या १४वे षटत टाकण्यासाठी आला होता. पंड्याच्या सहाव्या चेंडूवर हैदरने डीप मिडविकेटच्या दिशेने जोरदार फटका मारला. यावेळी त्याने मारलेला चेंडू सूर्यकुमार यादव याने झेलला. यानंतर पंड्याने हैदरकडे बघून स्मित हास्य केलं. यादरम्यानच्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पंड्याचा हा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
हैदर अलीपूर्वी पंड्याने १४व्या षटकात दुसऱ्याच चेंडूवर शादाब खानला देखील झेलबाद केले होते. विशेष म्हणजे, शादाबदेखील सूर्यकुमारच्या हातातूनच झेलबाद झाला होता. पंड्याच्या गोलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा खर्च करतच २ विकेट्स घेतल्या.