नवी दिल्ली : अपघाताचे बरेच व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल होत असताना बघत असतो. पण सध्या एक असा व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. एखाद्याला कारने चिरडलं तर त्या व्यक्तीचं काय होईल, साहजिकच त्या व्यक्तीला गंभीर दुखापत होईल किंवा त्या व्यक्तिचा मृत्यू होईल. पण या व्हिडिओत चक्क एक चिमुकलीला कारने चिरडलं तरी ती पुढच्या क्षणी स्वत: उठून पळू लागली असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

हा चमत्कारिक अपघाताचा व्हिडिओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. अंगावर काटा आणणार असा हा व्हिडिओ आहे. ज्याचा शेवट त्यापेक्षाही थरारक आहे. देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. हेच या अपघाताच्या व्हिडिओत दिसून येत आहे.

संपूर्ण संघाला निराश करणारी विकेट; जगाची धुलाई करतो पण पाकिस्तानविरुद्ध…
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक मुलगी सायकलवरुन जाताना दिसत आहे. इतक्यात समोरुन एक कार येते. मुलगी अचानक समोर आल्याने कार चालकही कार कंट्रोल करु शकत नाही आणि गाडी थेट त्या चिमुकलीला उडवते. गाडीने धडक देताच चिमुकली हवेत उडून जमिनीवर कोसळते. कारही तिच्या अंगावरुन जाते. कारचं पुढील चाक तिच्या शरीरावरुन जात असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. कारचं मागील चाकही तिच्या अंगावर जाणार तेवढ्यात गाडी थांबते.

मुलगी कारखाली चिरडली जाते हे बघून कोणचाही काळजाचा थरकाप उडेल. या मुलीचा जीव वाचला असेल अशी आशाही व्हिडिओ बघून वाटत नाही. मात्र, पुढे तुम्ही पाहिलं तर तीच मुलगी स्वत:च कारखालून उठते आणि तिथून पळून निघून जाते.

IND vs Pak : पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याची कातिल स्माईल, Video तुफान व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here