वाचा:
कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातून परदेशासह देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यामध्ये वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, साखर, गूळ,सूत, गारमेंट, हळद, शेती औजारे, भाजीपाला, फुले, फळे यांचा समावेश आहे. वर्षाला आठ हजार कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात होते. मार्चपासून या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन महिने ही निर्यात पूर्णपणे बंद होती. त्यानंतर ती काही प्रमाणात सुरू झाली आहे. सध्या मालवाहतूक व इतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या सुट्या भागांना फारशी मागणी नाही. कारण या वाहनांच्या खपावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे असे सुटे भाग अजूनही गोडाऊनमध्ये पडून आहेत.
या परिसरात दरमहा सत्तर हजार टन कास्टिंगची निर्मिती होते. त्यातून दरमहा ६०० ते ७०० कोटीची निर्यात होते. पण गेल्या तीन महिन्यापासून कच्चा माल कमी पडत आहे. हा माल मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून येतो. तेथे लॉकडाऊन कडक आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आवक होण्यावर झाला आहे. सुदैवाने सध्या ट्रॅक्टरला प्रचंड मागणी आहे. साधारणत: वर्षाला आठ लाख ट्रॅक्टरची निर्मिती होते. त्याला लागणारे नव्वद टक्के सुटे भाग कोल्हापुरात तयार होतात. मे आणि जूनमध्ये वीस हजारावर ट्रॅक्टरची विक्री झाली. पण आता कच्चा माल आणि परप्रांतीय कामगारांची कमतरता भासू लागल्याने संधी असूनही उत्पादनावर मर्यादा येत आहेत. परदेशातून हळूहळू मागणी येत आहे. पण त्याचा निर्यात खर्च वाढला आहे. इतर राज्यातील निर्यातीवरही परिणाम झाला आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील सध्या अडचणीत आला आहे.
वाचा:
कुठे, काय निर्यात होते?
साखर : सौदी अरेबिया, चीन, बांग्ला देश, अफ्रिका
वाहनाचे सुटे भाग : रशिया, अमेरिका, इटली, जर्मनी, कोरिया, ब्राझिल
सूत, कापड : सौदी अरेबिया, रशिया, अफ्रिका, पाकिस्तान
ट्रॅक्टरची वाढती मागणी आशेचा किरण
गेल्या वर्षी जून महिन्यात भारतात ७५,८५९ ट्रक्टरची विक्री झाली होती. यावर्षी म्हणजे जून २०२० मध्ये तब्बल ९२,८८८ ट्रॅक्टरची विक्री झाली. शेतीच्या कामात वाढलेला ट्रॅक्टरचा वापर, सरकारकडून मिळणारे अनुदान यामुळे त्यांचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या ट्रक्टरसाठी लागणारे ९० टक्के सुटे भाग कोल्हापुरातच तयार होतात. दोन महिन्यात तब्बल साठ हजार ट्रक्टरला पुरतील एवढे सुटे भाग निर्यात झाले आहेत. यामुळे ट्रक्टरची ही वाढती मागणीच दक्षिण महाराष्ट्रातील फाऊंड्री उद्योगाला तारणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times