पुणे : मेलबर्नमध्ये झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या थरारक सामन्यात भारताचा ४ गडी राखून विजय झाला. या विजयानंतर देशभरामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. पुण्यातही एफसी रोडवर तरुणाई भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर एकटवल्याचे दिसून आले.

भारताने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारल्यानंतर देशभरामध्ये विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे. भारतीय संघानं दिवाळीचं मोठं गिफ्ट दिल्याची भावना प्रेक्षकांनी, क्रिकेच प्रेमींनी व्यक्त केली. पुण्यातील एफसी रोडवर आणि गुड-लक (Good Luck Chowk) चौकात भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाई एकटवली होती. शेकडो तरुणांनी एफसी रोड विविध घोषणांनी दुमदुमला होता. पण आनंद साजरा करताना तरुणाईला वाहतूक कोंडी झाल्याचे भान राहिले नव्हते.

मनसे शिंदे फडणवीसांसोबत युती करणार का? राजू पाटलांकडून चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात
बराचवेळ एफसी रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहवयास मिळाली. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. एफसी रोडवर पोलिसांनी सौम्य लाठीजार्च केला. त्यानंतर काही वेळाने एफसी रोडवरील वाहतूक सुरळीत झाली. त्यामुळे कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गुवाहाटीला गेलो म्हणून राणा मंत्रिपदाच्या रांगेत, बच्चू कडूंनी सगळा हिशोब काढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here