पाकिस्तानविरुद्धच्या थरारक सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. काळजाची धडधड वाढवणाऱ्या सामन्यात भारतानं रोमहर्षक विजय मिळवला. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताचा दारुण पराभव केला होता. त्या पराभवाचा भारतानं बदला घेतला.

 

virat 2
मेलबर्न: पाकिस्तानविरुद्धच्या थरारक सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. काळजाची धडधड वाढवणाऱ्या सामन्यात भारतानं रोमहर्षक विजय मिळवला. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताचा दारुण पराभव केला होता. त्या पराभवाचा भारतानं बदला घेतला. मेलबर्नमध्ये रंगलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावा भारताच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरल्या.

पाकिस्ताननं दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये भारताची दाणादाण उडाली. भारताची अवस्था ४ बाद ३१ अशी झाली होती. या परिस्थितीतून कोहलीनं हार्दिक पांड्याच्या मदतीनं डाव सावरला आणि भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. विराट आणि हार्दिकनं ११३ धावांची भागिदारी साकारत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं.
फ्री हिटवर बोल्ड झाल्यावर विराटनं ३ धावा काढल्या; पाकिस्ताननं वाद घातला; नियम काय सांगतो?
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाझच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक बाद झाला. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर केवळ तीन धावा आल्या. त्यामुळे विजयासाठी ३ चेंडूंमध्ये १३ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर कोहलीनं षटकार ठोकला. हा चेंडू कंबरेच्या वर होता. पण पंचांनी नोबॉल दिला नाही. चेंडू कमरेच्या वर असल्याचं कोहलीनं पंचांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर पंचांनी नोबॉल दिला. त्यामुळे पुढचं समीकरण ३ चेंडू ६ धावा असं काहीसं सोपं झालं.
झाली रडारड सुरू! पाकिस्तानचे चाहते म्हणतात भारतानं चीटिंग केली; ‘त्या’ दोन चेंडूंवर आक्षेप
पंचांनी नोबॉल दिल्यामुळे पुढचा चेंडू फ्री हिट होता. यावेळी नवाझनं वाईड बॉल टाकला. त्यामुळे ३ चेंडू ५ धावा असं समीकरण होतं. फ्री हिटवर कोहली बोल्ड झाला. चेंडू स्टम्पला लागून थर्ड मॅनच्या दिशेनं गेला. ते पाहून कोहली आणि कार्तिक पळत सुटले. त्यांनी ३ धावा काढल्या. फ्री हिटवर क्लीन बोल्ड झाल्यावर धावून काढलेल्या धावा मोजल्या जातात याची कल्पना कोहलीला होती. त्यानं सतर्कता दाखवली आणि भारताला मोलाच्या ३ धावा मिळाल्या. त्याच पुढे निर्णायक ठरल्या. कारण या ३ धावांमुळे हे समीकरण २ चेंडू २ धावा असं झालं. यानंतरच्या चेंडूवर कार्तिक बाद झाला. त्यामुळे एका चेंडूत २ धावा हव्या होत्या. अश्विन फलंदाजीला आला. पुढचा चेंडू वाईड पडल्यानं १ धावा हवी होती. अश्विननं चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here