Amruta Fadnavis new song | यापूर्वी अमृता फडणवीस यांनी गणपती उत्सव, दिवाळी आणि महिला दिनाच्यानिमित्ताने काही गाणी गायली होती. ही गाणी तेव्हा प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी त्यावेळी अमृता फडणवीस यांच्या गायनकौशल्याची तारीफ केली होती. अमृता फडणवीस यांच्या गाण्यांवर सोशल मीडियावर कायमच कमेंटसचा पाऊस पडताना दिसतो.

हायलाइट्स:
- ‘ओम जय लक्ष्मी माता’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे
- या गाण्यावर नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांच्या कमेंटसचा पाऊस पडत आहे
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर ‘ओम जय लक्ष्मी माता’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्यावर नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांच्या कमेंटसचा पाऊस पडत आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे नवे गाणेदेखील हिट ठरण्याची शक्यता आहे.
अमृता फडणवीस या अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांच्या व्यासपीठावरही अनेकदा गाताना दिसतात. लवकरच बॉलीवूड चित्रपटातही त्यांच्या आवाजातील गाणे ऐकायला मिळणार आहे. ‘लव्ह यू लोकतंत्र’ हा सिनेमा येत्या १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील एका रोमँटिक गाण्याला अमृता फडणवीस यांचा आवाज लाभला आहे. यानिमित्ताने अमृता फडणवीस यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. ‘ना जाने क्यू धडका ये दिल’ असे या नव्या गाण्याचे बोल आहेत. गाणं रिलीज होताच अमृता यांचं काही नेटकऱ्यांनी कौतुक केलंय तर काही यूजर्स नेहमीप्रमाणे त्यांची चेष्टा केली होती. मात्र, अमृता फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत आपली वाटचाल सुरु ठेवली होती.
यापूर्वी अमृता फडणवीस यांनी गणपती उत्सव, दिवाळी आणि महिला दिनाच्यानिमित्ताने काही गाणी गायली होती. ही गाणी तेव्हा प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी त्यावेळी अमृता फडणवीस यांच्या गायनकौशल्याची तारीफ केली होती. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्याप्रमाणे विरोधकांवर टीका करण्यासाठीही ओळखल्या जातात. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या गाण्यांवर सोशल मीडियावर कायमच कमेंटसचा पाऊस पडताना दिसतो.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.