शिरपूर : शिरपूर तालुक्यात गांजाची अवैध छुपी शेती सर्रासपणे केली जाते. यासंदर्भात पोलिसांनी वारंवार कारवाई करून अवैद्य गांजाची शेती करणार विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. शिरपूर तालुक्यातील रोहिणी गाव शिवारात कपाशीच्या आड होत असलेल्या गांजा शेती केली जात असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत तब्बल आठ लाखांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिणी गाव शिवारात ठेमश्या जमाल पावरा रा. चिखरखानपाडा, रोहिणी ता. शिरपूर याने त्याचे शेतात स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी वन जमिनीत कपाशीच्या पिकाआड बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली.

यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने दुपारी चार वाजेच्या सुमारास रोहिणी शिवारात शोध घेत गांजा शेतीवर छापा टाकला. शेतातून तब्बल ३९१ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. त्याची किंमत ७ लाख ८३ हजार ३२० रूपये इतकी आहे. या प्रकरणी असई कैलास जाधव यांच्या फिर्यादीवरून ठेमश्या पावरा याच्या विरोधत एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भिकाजी पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बोरकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गर्शनाखाली सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई भिकाजी पाटील, पोसई संदीप पाटील, पोहेकॉ अनिल चौधरी, संजय माळी, पवन गवळी, अनिल चौधरी, जाकीर शेख, पोना संदीप ठाकरे, अरिफ पठाण, सागर ठाकूर, मोहन पाटील, संजय चव्हाण, पोकॉ जयेश मोरे, योगेश मोरे, प्रकाश भिल, रोहिदास पावरा, संतोष पाटील, इसरार जकाउल्ला फारुकी यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here