मुंबई: मुंबईसह उपनगरात आज झालेल्या पावसामुळं ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व महापालिका आयुक्त आय. एस. चहल विरोधकांच्या टीकेच्या रडारवर आले आहेत. ‘मुंबईत ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करणारे आणि कंत्राटदारांची पाठराखण करणारे आता कुठे आहेत,’ असा सवाल भाजपचे आमदार अॅड. यांनी केला आहे. (BJP MLA criticises shivsena over nullah cleaning in Mumbai)

वाचा:

महापालिका व राज्य सरकार या वर्षी करोनाच्या लढाईत गुंतल्यानं मुंबईतील पावसाळापूर्व नालेसफाई रखडली होती. त्यातच सफाई कामगार व मजूर गावाकडं परतल्यानं तो एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चहल यांनी यात लक्ष घालून नालेसफाईच्या कामांना वेग देण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याच्या आधी नालेसफाईची कामं पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर काही दिवसांनी नालेसफाई झाल्याचे दावेही पालिकेनं केले होते. मात्र, कालपासून मुंबईत झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे.

वाचा:

किंग्ज सर्कल, हिंदमाता, माटुंगा अशा अनेक भागांत पाणी भरले. रस्त्यावर तुंबलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. भाजपचे आमदार शेलार यांनी यावरून सत्ताधाऱ्यांना व आयुक्तांना घेरलं आहे. ‘मुंबईत ११३ टक्के नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होते, कारण ४० टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही. आता कुठे आहेत ते ११३ टक्क्यांचे दावे करणारे? कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता का गायब आहेत?,’ असे प्रश्न शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here