नवी दिल्ली : आपण आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरत असतो. आपण महिन्यातून अनेक वेळा ते पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल घेण्यासाठी जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे पेट्रोल आणि डिझेल येते कुठून? त्याची किंमत कशी ठरवली जाते? हे पेट्रोल आपण आपल्या वाहनांमध्ये भरतो ते जमिनीतून थेट पेट्रोल पंपावर येत नाही. ती एक संपूर्ण प्रक्रिया आहे. त्यासाठी प्रथम कच्चे तेल मिळते. मग ते बाहेर काढले जाते. त्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेले जाते. शेवटी, कच्च्या तेलापासून पेट्रोल कसे काढले जाते आणि त्याची किंमत कशी ठरवली जाते. हे समजून घ्या.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मिश्रित पेट्रोल-डिझेलवर अतिरिक्त कर लांबणीवर
अशा प्रकारे पेट्रोल काढले जाते?
कच्च्या तेलापासून पेट्रोल काढले जाते. त्यासाठी प्रथम कच्चे तेलाच्या खाणी शोधल्या जातात. तेथून कच्चे तेल काढून नंतर ते रिफायनरीमध्ये नेले जाते. त्यानंतर रिफायनरीमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते. यानंतर पेट्रोल, डिझेल आणि जेट ऑइल हे सर्व त्यातून काढले जाते. त्यानंतर ते पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचवले जाते.

या रिफायनरीज करतात देशात पेट्रोलचे उत्पादन
देशभरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि रिलायन्स या सर्व कंपन्या या प्रक्रियेत सामील आहेत. कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल आणि जेट ऑइल काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे पण परंतू त्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे ते सर्वदूर उपलब्ध नाही.

आधीच महागाई त्यात OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका उडणार
कच्चे तेल खरेदी करावे लागेल
ज्या देशांमध्ये कच्च्या तेलाच्या खाणी किंवा विहीरी आहेत त्यांना कच्च्या तेलाच्या उपलब्धतेची अडचण येत नाही. पण ज्या देशात कच्चे तेल नाही, त्यांना ते इतर देशांकडून विकत घ्यावे लागते. प्रत्येक देशाची स्वतःची रिफायनरी असते. भारतात जवळपास २३ रिफायनरीज आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चे तेल विकत घेऊन या रिफायनरीजमध्ये आणले जाते. त्यानंतर त्यांच्यापासून पेट्रोल बनवले जाते.

पेट्रोल-डिझेल, LPG सिलिंडरच्या वाढत्या किमतींना ब्रेक लागणार, जाणून घ्या सरकारचे संपूर्ण प्लॅनिंग
तज्ज्ञांच्या मते, कच्चे तेल ही नैसर्गिक वस्तू आहे आणि ती जमीन आणि समुद्र तळाखाली उपलब्ध असते परंतू त्याचा शोध घेणे कठीण बाब आहे. संशोधन पथके कच्च्या तेलाचा शोध घेत असतात. यानंतर तेल काढण्याची प्रक्रियाही सुरू होते.

अशा प्रकारे निश्चित केली जाते किंमत
कच्च्या तेलाची किंमत रिफायनरीतून पेट्रोल पंपावर आणल्यावर निश्चित केली जाते. या तेलावर उत्पादन शुल्क आकारले जाते. यानंतर, डीलरचे कमिशन त्यात जोडले जाते. राज्य सरकारेही यावर स्वत:चा कर लावतात. त्यानंतर हे पेट्रोल आणि डिझेल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here