Palghar News: छतावर भूत असल्याचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सध्या पालघरमधील समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय. रस्त्यालगत फुटपाथवर झोपलेला तरुण, वारंवार हवेत उडणारा टेबल, कोणीही बसलेलं नसतानाही आपोआप चालणारी सायकल आणि छतावर सफेद पोशाख परिधान करून चालणारी महिला असे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

 

palghar video
पालघर: छतावर भूत असल्याचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सध्या पालघरमधील समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय. रस्त्यालगत फुटपाथवर झोपलेला तरुण, वारंवार हवेत उडणारा टेबल, कोणीही बसलेलं नसतानाही आपोआप चालणारी सायकल आणि छतावर सफेद पोशाख परिधान करून चालणारी महिला असे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओतून भूत असल्याचं भासवण्यात येत आहे. हा व्हिडिओ पालघर शहरातील कचेरी रोड परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात हा व्हिडिओ कुठला आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र पालघरमध्ये सध्या याच व्हिडिओची जोरदार चर्चा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाच ते सहा मिनिटांचा आहे. यामध्ये लहान मुलांची तीन चाकी सायकल रस्त्यावर चालताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही सायकल कोणीही चालवत नाहीए, कोणीही ढकलत नाहीए. त्यानंतर काहीच वेळात छतावर सफेद पोशाख परिधान केलेली तरुणी ये-जा करताना दिसत आहे. छतावर तरुणीच्या हालचाली सुरू असतानाच खाली असलेला प्लास्टिकचा स्टूल अचानक हवेत उडू लागल्याचं यात दिसून येत आहे . मात्र हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर हा सर्व खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट होतंय.
VIDEO: असा एन्काऊंटर पाहिलाय का? पायावर गोळी लागली; काही सेकंदांत आरोपी उठून चालू लागला
या व्हिडीओत रात्री रस्त्यालगत झोपलेला तरुण त्याच्या पोशाखावरून रस्त्याशेजारच्या फुटपाथवर झोपणाऱ्यांप्रमाणे वाटत नाही. तसंच त्याच्या पेहरावावरून तो सुशिक्षित दिसतोय आणि तो गरीब वाटत नाही. शिवाय व्हिडिओच्या शेवटी या झोपलेल्या तरुणाच्या अंगावर अचानक चादर गुंडाळली जात असून या सगळ्यामुळे भीती निर्माण झाल्याने पळून जाणारा तरुण हा निव्वळ देखावा करत असल्याचं स्पष्ट होतंय. हा व्हिडिओ कुठला आहे याबद्दल अद्याप कुठलीही स्पष्टता झाली नसली तरी काही खोडसाळ तरुणांनी मनोरंजनाच्या दृष्टीने हा सीसीटीव्ही व्हिडिओ तयार केल्याचं दिसून येत आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण होण्याआधीच पालघर पोलिसांनी चौकशी करून सत्यता बाहेर आणावी अशी मागणी समाज माध्यमांवर होत आहे .

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here