Ind Vs Pak world cup match | सुंदर पिचाई यांचे हे ट्विट थोड्यावेळात सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी सुंदर पिचाई यांच्या सुरात सूर मिसळला. मात्र, एका पाकिस्तानी चाहत्याला सुंदर पिचाई यांनी भारतीय संघाच्या विजयाबद्दल व्यक्त केलेला आनंद बघवला नाही. त्यामुळे या पाकिस्तानी ट्रोलरने सुंदर पिचाई यांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुंदर पिचाई यांनीही या ट्रोलर्सना मोजक्या शब्दांत सडेतोड प्रत्युत्तर देऊन त्याची बोलती बंद केली.

हायलाइट्स:
- भारताकडून पाकिस्तानी संघाचा पराभव
- विराट कोहलीची मॅचविनिंग खेळी
सुंदर पिचाई यांचे हे ट्विट थोड्यावेळात सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी सुंदर पिचाई यांच्या सुरात सूर मिसळला. मात्र, एका पाकिस्तानी चाहत्याला सुंदर पिचाई यांनी भारतीय संघाच्या विजयाबद्दल व्यक्त केलेला आनंद बघवला नाही. त्यामुळे या पाकिस्तानी ट्रोलरने सुंदर पिचाई यांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुंदर पिचाई यांनीही या ट्रोलर्सना मोजक्या शब्दांत सडेतोड प्रत्युत्तर देऊन त्याची बोलती बंद केली. या सगळ्या संभाषणाचे स्क्रीनशॉटस व्हायरल झाल्यानंतर सुंदर पिचाई यांचे ट्विट वेगाने व्हायरल झाले. अवघ्या काही तासांमध्ये हजारो लोकांनी सुंदर पिचाई यांचे ट्विट रिट्विट आणि लाईक केले.
नेमकं काय घडलं?
सुंदर पिचाई यांनी टीम इंडियाने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करणारे ट्विट केले. त्यानंतर काहीवेळातच मोहम्मद शाहबाज या पाकिस्तानी व्यक्तीने सुंदर पिचाई यांना डिवचायला सुरुवात केली. भारत-पाकिस्तान सामन्यातील शेवटच्या तीन ओव्हर्स पुन्हा पाहून मी आज पुन्हा दिवाळी साजरी केली, असे सुंदर पिचाई यांनी म्हटले होते. त्यावर मोहम्मद शाहबाजने, ‘तुम्ही पहिल्या तीन ओव्हर्सही बघायला पाहिजेत’, असा रिप्लाय दिला. त्यावर सुंदर पिचाई यांनी हजरजबाबीपणा दाखवत म्हटले की, ‘मी तेदेखील केले. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीपचा स्पेस कसला भारी होता’. यानंतर पाकिस्तानी चाहत्याने, ‘मी भारतीय संघाची फलंदाजी सुरु असतानाच्या पहिल्या तीन ओव्हर्सबाबत बोलत आहे’, असे म्हटले. मात्र, मोहम्मदने उत्तर देईपर्यंत सुंदर पिचाई यांचे ट्विट व्हायरल झाले होते. त्यानंतर भारतीय संघाच्या चाहत्यांनी मोहम्मद शाहबाजला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. अखेर संबंधित पाकिस्तानी चाहत्याने ‘ठीक आहे’, म्हणत माघार घेतली.
शेवटच्या ओव्हरपर्यंत थरार
पाकिस्ताननं दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये भारताची दाणादाण उडाली. भारताची अवस्था ४ बाद ३१ अशी झाली होती. या परिस्थितीतून कोहलीनं हार्दिक पांड्याच्या मदतीनं डाव सावरला आणि भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. विराट आणि हार्दिकनं ११३ धावांची भागिदारी साकारत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावा हव्या होत्या. या षटकातही अत्यंत चुरस पाहायला मिळाली. मात्र, सरतेशेवटी भारतीय संघाने हा सामना जिंकला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.