पुणे : डोंगरावर चरण्यासाठी गेलेला सर्जा नावाचा बैल खोल दरीत कोसळल्यानं गेल्या २५ दिवसांपासून दरीत अडकून पडला आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यातल्या दुर्गम भागातील रांजणे गावात ही घटना घडली आहे. बैलाच्या काळजीपोटी दरीत दोर लावून खाली उतरत बैलाला जमेल तितका चारा, पाणी औषध, पोहोचवण्याचा प्रयत्न शेतकरी विजय शेंडकर करत आहेत.

शेतकऱ्याचे त्याच्या बैलावर असलेले जीवापाड प्रेम आजवर अनेक प्रसंगातून सामोरे आलं आहे. वेल्हे तालुक्यातील दापोडे गावातील शेतकरी विजय मारूती शेंडकर यांचा सर्जा नावाचा बैल रानात चरताना २५ दिवसांपूर्वी रांजणे गावाच्या हद्दीतील दरीत कोसळला. दुर्दैवाने अशा ठिकाणी तो पडला की तेथून त्याला पायवाटेने बाहेर काढणे अशक्य आहे. गेले २५ दिवस शेतकरी विजय शेंडकर आणि त्यांचे कुटुंबीय बैलाच्या काळजीपोटी त्या दरीत दोर लावून खाली उतरत आहेत. बैलाला औषध पाणी करीत आहेत. जमेल तितका चारा पाणी तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न स्वतःच्या जिवाची पर्वा न करता करत आहेत. मात्र २५ दिवसांपासून अडकून पडलेल्या सर्जाला आता अशक्तपणा आला आहे.

तीन महिन्यापूर्वी आम्हीही मॅच जिंकलो, मेलबर्नला बाळासाहेबांची शिवसेना झळकली, शिंदेंची बॅटिंग

बैलाला बाहेर काढण्याचे सर्व उपाय केल्यानंतरही अपयश आल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल झालं आहे. त्यानंतर शेतकऱ्याने पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते माऊली दारवटकर यांच्याशी संपर्क केल्यानंतर, दारवटकरांनी या परिसराच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर खासदार सुळे यांनी जिल्हा आपत्ती कक्षाशी संपर्क साधत तातडीनं मदत पोहचवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती माऊली दारवटकरांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here