मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करून कोणाला कमवायचे नसते? तुम्हालाही शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाई करायची असेल, तर तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे की दिवाळीचा मुहूर्त हा शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु करण्यासाठी सर्वोत्तम दिवस ठरू शकतो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाते. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंगबाबत सकारात्मक दिसत आहेत.

यंदा तीन मल्टीबॅगर स्टॉक्स दिवाळीच्या निमित्त चर्चेत आले आहेत. या समभागांमध्ये २२ ते ३८ टक्केपर्यंत वाढ होण्याची क्षमता आहे. इतकेच नाही तर गेल्या दोन वर्षात या समभागांनी लक्षणीय वाढ नोंदवली आहे. २४ ऑक्टोबरच्या संध्याकाळी म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांना मुहूर्त ट्रेडिंगचा एक भाग म्हणून भांडवली बाजार, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटीज आणि इतर शेअर्समध्ये व्यापार करण्याची संधी मिळेल.

पहिल्यांदा गुंतवणूक करताय, दिवाळीत गुंतवणूक करून अधिक नफा कमवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी फॉलो करा
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
व्यवसायाच्या दृष्टीने सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक देना बँक आणि विजया बँकेत विलीन झाल्यानंतर एक मजबूत ग्राहक मताधिकार आहे आणि अनेक तिमाहीपासून सातत्याने नफा नोंदवला आहे. आपल्या नोटमध्ये स्टॉक ब्रोकरेज LKP सिक्युरिटीजने बँक ऑफ बडोदा वर रु. १७५ च्या लक्ष्य किंमतीसाठी ‘खरेदी’चा सल्ला दिला आहे. बँक ऑफ बडोदा हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. गेल्या दोन वर्षात या स्टॉकमध्ये आता पर्यंत जवळपास २३७ टक्क्याने वाढ झाली आहे. तर २१ ऑक्टोबर २०२० रोजी स्टॉक रु. ४३ च्या खाली होता. चालू वर्षात आतापर्यंत बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये ७१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

मुहूर्त ट्रेडिंग जवळ आलंय; भविष्यात मोठी कमाई करण्यासाठी ‘या’ शेअर्सवर नशीब आजमावा
फेडरल बँक (Federal Bank)
फेडरल बँकेने या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा कमावला असून गेल्या एका वर्षात तिच्या शेअरच्या किमतीत ४० टक्के वाढ झाली आहे आणि पुढील एका वर्षातही बँकेने अशीच प्रगती पुढे चालू ठेवण्याचा ब्रोकरेजला अपेक्षित आहे. फेडरल बँकेवर LKP ने रु. १८० ची लक्ष्य किंमत सेट केली आहे आणि ‘खरेदी’ म्हणून शिफारस केली आहे. सध्याच्या बाजारभावापेक्षा ही जवळपास ३६% संभाव्य वाढ असेल. दिवंगत राकेश झुनझुनवाला हे फेडरल बँकेचे सर्वात मोठे गुंतवणूकदार होते. ते आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे बँकेत ७५,७२१,०६० किंवा ३.६% इक्विटी शेअर्स आहेत. गेल्या दोन वर्षांत समभागांनी सुमारे १३३ टक्क्यांची मोठी चढ-उतार नोंदवली आहे.

बाजारातील विशेष ट्रेडिंग; दिवाळीच्या मुहूर्तावर ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करा, मोठा धनलाभ होईल
श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर (Schneider Electric Infrastructure)
LKP नुसार ग्रीड आधुनिकीकरण, शाश्वत ऊर्जा आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांसह ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांमुळे श्नाइडरसाठी अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण झाले आहे. LKP ने श्नाइडरसाठी प्रत्येकी रु. २३६ च्या लक्ष्य किंमत सेट केली असून ‘खरेदी’चा सल्ला दिला आहे. शुक्रवारी, श्नाइडरचे शेअर्स बीएसईवर १.३६% ने घरून प्रत्येकी रु. १७०.७५ वर बंद झाले.

तसेच २०२२ मध्ये आतापर्यंत बाजारात शेअर्स ५६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले असून दोन वर्षात शेअर्स बीएसई वर १३५% पेक्षा जास्त वाढीसह मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. २१ ऑक्टोबर २०२० रोजी शेअर्स रु. ७३ च्या खाली होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here