पुणे : धनत्रयोदशीच्या निमित्ताने पूजा करण्यासाठी बँकेच्या लॉकरमधून घरी आणलेल्या ७ लाख ९३ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. कर्वेनगर येथील एका बंगल्यात शुक्रवारी रात्री ११ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुणे विद्यापीठ सोसायटीतील एका बंगल्यात राहणाऱ्या ३० वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचे प्रतीक म्हणून सोन्या-चांदीचे दागिन्यांचे पूजन केले जाते. त्यासाठी या तरुणाने बँकेच्या लॉकरमधून सोन्याचे व चांदीचे दागिने घरी आणले होते. त्याचे विधिवत पूजन केल्यानंतर फिर्यादी व त्यांचे कुटुंब रात्री झोपले. मात्र, त्यांनी बंगल्याचा दरवाजा पूर्णपणे लॉक केला नाही. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करत देवघराजवळ ठेवलेले ७ लाख ९३ हजार ८०० रुपये रुपये किंमतीचे २२६ ग्रॅम सोन्याचे व पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने चोरुन नेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

मोबाईल दुरुस्तीसाठी नेला, दुकानदारानं हात लावताच स्फोट; धडकी भरवणारा VIDEO…
चाळीस मोबाइल लंपास

धनत्रयोदशीच्या दिवशी हडपसर परिसरातील एका मोबाइल विक्री दुकानाच्या शटरवरील खिडकी तोडून चोरट्यांनी दुकानातील ७ लाख १८ हजार ३७८ रुपये किंमतीचे चाळीस मोबाईल लंपास केले. याबाबत दुकानचालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

याशिवाय उंड्री येथील कानडे नगर परिसरातील एका किराणा व शीतपेयांची किरकोळ विक्री करणाऱ्या गोदामाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी तेलाचे डबे, शीतपेयांचे बॉक्स, काजू, बदाम, वेलदोड्याची पाकिटे असे ८९ हजार ७५० रुपयांचे साहित्य चोरुन नेले. याबाबत गोदामाच्या मालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्यांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? कधी अन् कसे? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here