मुंबई : गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात अनेक कंपन्यांना शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड मिळणार आहेत. आज म्हणजेच दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी ६.१५ वाजल्यापासून शेअर बाजार एक तास खुला असेल. या काळात गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकतील. यादरम्यान शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांना यंदाच्या आठवड्यात अनेक समभाग एक्स-डिव्हिडंडचे व्यवहार करणार आहेत.

या आठवड्यात लक्ष केंद्रित करणार्‍या लाभांश देणार्‍या स्टॉकची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहेत…

मुहूर्त साधण्यासाठी तयार ना! दिवाळीत ३ मल्टीबॅगर स्टॉक्सची चर्चा, दोन वर्षात झाली लक्षणीय वाढ
सायंट (Cyient)
कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांशाची रेकॉर्ड तारीख २७ ऑक्टोबर २०२२२ निश्चित केली आहे. म्हणजेच कंपनी मंगळवारी शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड म्हणून व्यवहार करेल. पात्र गुंतवणूकदारांना कंपनीच्या वतीने प्रति शेअर १० रुपये लाभांश दिला जाईल. कंपनी ९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत हा लाभांश देईल.

ICICI लोम्बार्ड
कंपनीच्या संचालक मंडळाने २८ ऑक्टोबर २०२२ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली असून कंपनी स्टॉक मार्केटमध्ये २७ ऑक्टोबर २०२२ रोजी एक्स-डिव्हिडंड देईल. कंपनीने प्रति शेअर ४.५० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे, जो १६ नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी भरले जातील.

इन्फोसिस (Infosys)
दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसन कंपनीने प्रति शेअर १६.५० रुपये लाभांश जाहीर केला आहे. त्याच्या लाभांशाची रेकॉर्ड तारीख २८ ऑक्टोबर २०२२ आहे. कंपनी २७ ऑक्टोबर रोजी एक्स-डिव्हिडंड म्हणून शेअर बाजारात व्यवहार करेल.

स्मॉल कॅप कंपनीही नफा वाटतेय
स्मॉल कॅप कंपनी फोकस बिझनेस सोल्युशन्सनेही लाभांश देण्याचा निर्णय घेत लाभांशासाठी २७ ऑक्टोबर २०२२ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. पात्र गुंतवणूकदारांना कंपनीच्‍या वतीने प्रति शेअर ०.३८ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी (KPI Green Energy)
KPI ग्रीन एनर्जीच्या वतीने पात्र गुंतवणूकदारांनाही लाभांश दिला जाईल. कंपनीने या लाभांशासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. २८ ऑक्टोबर रोजी कंपनी बाजारात एक्स-डिव्हिडंड देईल. KPI ग्रीन एनर्जीने प्रति शेअर ०.२५ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.

(डिस्‍क्‍लेमर: येथे दिलेली माहिती केवळ स्टॉकच्या कामगिरीबद्दल आहे, हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here