मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी शिवाजी पार्क इथल्या मैदानात दिवाळीच्या निमित्ताने दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दीपोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मराठी सेलिब्रिटींसह सर्वसामान्य नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारही दीपोत्सवाला उपस्थित होते. या ‘शो’ची सूत्रसंचालक आणि प्रख्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने देखील उपस्थिती लावली. त्यानंतर ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानीही गेली होती.

प्राजक्ताने राज ठाकरे, त्यांच्या सूनबाई मिताली ठाकरे आणि नातू किआन अमित ठाकरे यांच्यासोबत फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर २४ तासातच दीड लाखाच्या आसपास लव्ह, तर हजारो कमेंट्स आल्या आहेत. मात्र त्यापैकी एक कमेंट लक्ष वेधून घेत आहे. संदेश सावंत नामक इन्स्टाग्राम युजरने प्राजक्ताला थेट राजकारणात उडी मारण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर प्राजक्तानेही उत्तर दिलं आहे.

काय आहे प्राजक्ताची पोस्ट?

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या” शिवाजी पार्क येथील “दीपोत्सवाच्या” निमित्ताने पदरात पडलेले काही खास क्षण… दीपोत्सवाच्या आमंत्रणासाठी, अतिशय प्रेमानं केलेल्या पाहुणचारासाठी खूप धन्यवाद.. “मा. श्री राजसाहेब ठाकरे” – अतिशय गोड अशा “शर्मिला ताई” आणि अमेय खोपकर. दीपोत्सव बघून इतकी भारावून गेले की फोटो काढायचे विसरले… त्यामुळे नेमके ते फोटोज् नाहीत.. असो पण.. किआन बरोबर फोटो काढला…(त्याला भेटायचच होतं…) असं प्राजक्ताने लिहिलंय.


हेही वाचा : मॅचपूर्वी सेक्स केल्यास खेळाडूचा परफॉर्मन्स बूस्ट होतो का? चर्चेतल्या बातमीत कितपत तथ्य?

चाहत्याची कमेंट काय?

तू स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याची हीच ती योग्य वेळ. तुझा अत्यंत सकारात्मक दृष्टीकोन असतो आणि तू माणूस म्हणून उत्तम आहेस. तुझा हिंदुत्वावर विश्वासही आहे. माझा तुला सल्ला आहे की तू नवीन पक्ष काढावास. महाराष्ट्राला नवीन राजकीय पक्षाची आवश्यकता आहे. आणि ती तूच आहेस प्राजू. तू महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री व्हावीस, अशी माझी इच्छा आहे, अशा आशयाची इंग्रजी कमेंट संदेश सावंत नावाच्या युजरने केली आहे. त्यावर कोणी त्याला पाठिंबा दर्शवला आहे, तर कोणी विरोध. मात्र प्राजक्ताने “थँक यू” म्हणत त्याचे आभार मानले आहेत.

Prajakta Mali Comment

दरम्यान, प्राजक्तान शेअर केलेल्या या फोटोंमध्ये इतर सेलिब्रिटीही दिसून येत आहे. अशोक सराफ, निवेदिता सराफ, संतोष जुवेकर, विशाखा सुभेदार, संजय नार्वेकर, वंदना गुप्ते आदींनी या दीपोत्सवाला हजेरी लावली होती.

हेही वाचा : ऋतुराज गायकवाडसोबत अफेअरच्या चर्चांवर सायली संजीव म्हणते ‘माझ्यापेक्षा तो खूपच…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here