जयपूर: राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी यांना पदांवरून दूर हटवल्यानंतर पहिल्यांदाच मौन सोडत पायलट आणि त्यांच्या समर्थकांच्या बंडखोरीवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले गेले असून त्यासाठी २० कोटींची डील होत आहे आणि याचे माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, असा खळबळजनक दावा गहलोत यांनी केला आहे. सचिन पायलट हे या कटात सहभागी असून या घोडेबाजारात सचिन पायलट पुढाकार घेत होते असा थेट आरोप गहलोत यांनी पायलट यांच्यावर केला आहे. पायलट यांच्यावर गंभीर आरोप करतानाच चांगले इंग्रजी बोलता येणे, स्मित देणे पुरेसे नसते, असा टोलाही गहलोत यांनी सचिन पायलट यांना लागवलाय.

सचिन पायलट किती पैसे द्यायचे हे ठरवत होते- गहलोत

सचिन पायलट या घोडेबाजारात सहभागी झाल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला आहे. ते स्वत: कोणाला किती पैसे द्यायचे हे ते ठरवत होते. याबाबतच्या फोनची रेकॉर्डिंगही आमच्याकडे आहे, असे गहलोत म्हणाले. आपले निकटवर्तीय कोण आणि कोणोकावर छापे मारले जावे, याची यादीही सचिन पायलटच देत होते, असे एकपेक्षा एक खळबळजनक आरोप गहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर केले.

देशात घोडेबाजार सुरू आहे, त्यामुळे देशाचा नाश होईल, असे म्हणत हे माध्यमांना दिसत नाही का, असा सवालही त्यांनी विचारला.

अशोक गहलोत यांनी उपस्थित केलेले दहा मुद्दे:

१. …असे त्याचे दलाल होते. त्यांनी घोडेबाजाराचे काम केले. ते पैशांची ऑफर करत होते. आमच्याकडे पुरावे आहेत.

२. या देशाच्या प्रसारमाध्यमांना काय ऐकायचे आहे? यांना जर काँग्रेस आणि गांधी कुटुंबाबाबत जर मनाच अढी असेल, तर ती आपल्या मनात ठेवा. ज्या देशात लोकशाही नष्ट करण्याचा कट रचला जात आहे, मीडिया हा चौथा खांब म्हटला जातो.. या विरोधात आवाज उठवणे हे मीडियाची जबाबदारी नाही का?

३. देशात असे अनेक मीडियाचे लोक आहेत, जे केंद्र सरकारकडून, भाजप कडून पैसे घेतात… संगनमत करतात… ही नव्या पिढीची मुले-मुली आहेत. त्यांनी देशाच्या हितासाठी काम केले पाहिजे. देशातील लोकशाही नष्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तरुण पिढीचे अँकर एकतर्फी बातम्या चालवतात.

४. देशात घोडेबाजार होत आहे. लाखो-कोट्यवधी रुपये वाटले जात आहेत. जयपूरमध्ये परवाच डिलिंग केली जात होती. आमच्याकडे माहिती आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. २० कोटींचा सौदा केला जात होता.

५. एसजीओने तुम्हाला नोटीस बजावली, मला देखील एसजीओने नोटीस दिली आहे. भाजपकडून राजस्थानात घोडेबाजार होत असल्याची तक्रार आम्ही, काँग्रेसने एसओजीकडे केली होती. १० दिवस आम्हाला लोकांना हॉटेलात ठेवावे लागले. मला हे योग्य वाटले का?

७. आता नवी पिढी आली आहे. आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. येणारा उद्याचा काळ त्यांचाच आहे. आम्हाला ते आवडत नाहीत हे जे ते म्हणतात ते चुकीचे आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, अशोक गहलोत यांना ते आवडतात. जेव्हा आमची बैठक होते तेव्हा मी युवक काँग्रेससाठी एनएसयूआयसाठी लढाई लढत असतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here