नवी दिल्ली : पुढील वर्षापर्यंत जगभरात सर्वांनाच मंदीचा सामना करावा लागणार याबद्दल गेली काही महिन्यांपासून बोलले जात आहे. मंदीचा फटका म्हणून अमेरिकेसह अनेक देशांच्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यामध्ये आता आणखी एका दिग्गज कंपनीचे नाव जोडले जाणार आहे. आयटी क्षेत्राला मंदीचा सर्वाधिक धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

अरेच्चा! आधीच महागाई त्यात बेरोजगारीचं टेन्शन, ७५% ट्विटर कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता
प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी फिलिप्सने नोकऱ्या कपातीची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले की उत्पादकता सुधारण्यासाठी आणि तरलता वाढवण्यासाठी ४,००० नोकऱ्या कमी करण्यात येणार आहेत. ऑपरेशनल आणि पुरवठा आव्हानांमुळे तिसऱ्या तिमाहीतील विक्रीवर परिणाम झाल्याचे फिलिप्सने एका निवेदनात म्हटले. अशा परिस्थितीत दिवाळीच्या काळात कंपनीचा हा निर्णय हजारो कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक आहे. कंपनीने सांगितले की, समुहाची विक्री ४.३ अब्ज यूरो राहिली असून विक्रीत ५ टक्क्यांनी घट झाली आहे. हा आकडा १२ ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या अपडेट्सवर आधारित आहे.

जगाची मंदीकडे वाटचाल; आता मायक्रोसॉफ्टमधून १ हजार कर्मचाऱ्यांना डच्चू
सीईओची घोषणा
फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी एका निवेदनात म्हटले की, उत्पादकता आणि कामकाजाच्या पद्धती सुधारण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, आम्ही जागतिक स्तरावर सुमारे ४,००० कर्मचारी कमी करू. ते पुढे म्हणाले की हा एक कठीण, पण आवश्यक निर्णय आहे. कंपनीकडे फारसे या पर्यायाव्यतिरिक्त काही शिल्लक नसल्याचेही त्यांनी म्हटले.

Recession2K22: BYJU’s मधल्या २ हजार ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार
फिलिप्ससमोर कोणते संकट
“फिलिप्सला फायदेशीर संस्थेत रूपांतरित करण्यासाठी आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी ती एक मौल्यवान कंपनी बनवण्यासाठी अशा लवकर कृती (ऍक्शन) आवश्यक आहेत,” जेकब्स म्हणाले. गेल्या तिमाहीत फिलिप्सच्या कामगिरीवर ऑपरेशनल आणि पुरवठा आव्हानांमुळे गंभीर परिणाम झाला आहे.

दरम्यान, चलनवाढीचा दबाव, चीनमधील कोविड आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे कंपनीला अनेक देशांमधील व्यापाराचा मोठा फटका बसला आहे. सध्या कमी तरलता, वाढलेला खर्च आणि कच्च्या मालाचा जास्त वापर यामुळे कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. २०२१ च्या Q3 मध्ये मजबूत ४७ टक्के वाढीमुळे तुलनेने ऑर्डरचे प्रमाण ६ टक्क्यांनी घसरले आहे. तसेच बुक-टू-बिल प्रमाण १.१८ होते आणि उपकरणांच्या ऑर्डर बुकमध्ये तिमाहीत आणखी वाढ झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here