गरियाबाद: छत्तीसगडच्या गरियाबंद पोलिसांनी एका व्यक्तीला, त्याच्या पत्नीला आणि भावाला अटक केली आहे. लहान भावाकडून पहिल्या पत्नीवर बलात्कार घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दुसऱ्या पत्नीच्या मदतीनं मिळून त्यानं हे कृत्य केलं. पहिल्या पत्नीनं लग्नात पुरेसा हुंडा न दिल्यानं आरोपीनं हे कृत्य केल्याचं तपासातून उघड झालं. पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्यांची रवानगी तुरुंगात केली.

गरियाबंद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. या गावातील एका महिलेनं तक्रार नोंदवली होती. तीन महिन्यांपूर्वी, जुलै २०२२ मध्ये आपलं लग्न संजय नावाच्या व्यक्तीशी झालं. पती लग्नानंतर हुंड्याची मागणी करू लागला. मात्र कुटुंबाला हुंडा देणं जमत नव्हतं. त्यामुळे लग्नाच्या दीड महिन्यांनंतर पतीनं दुसरा विवाह केल्याचं महिलेनं पोलीस तक्रारीत म्हटलं.
मी आयुष्य संपवतोय! वाशी ब्रिजवरून पत्नी, मेहुण्याला व्हिडीओ कॉल; तरुणाची खाडीत उडी
पीडितेनं विरोध केल्यावर पतीनं तिला मारहाण केली. ४ ऑक्टोबरला आपल्यावर बलात्कार झाल्याचं महिलेनं पोलिसांना सांगितलं. संजय आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीनं आपले हात-पाय पकडले आणि त्याचा लहान भाऊ तुमेश्वरला बलात्कार करण्यास सांगितलं, अशी व्यथा महिलेनं मांडली.
मंगळवारी मटण का करताय? नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण; दोघांच्या वादात शेजाऱ्याचा जीव गेला
पीडित महिलेनं २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी एफआयआर दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपी संजय, त्याची दुसरी पत्नी आणि लहान भाऊ तुमेश्वरला बेड्या ठोकल्या. हुंड्यासाठी छळ आणि बलात्कार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायाधीशांनी त्यांची रवानगी तुरुंगात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here