india vs pakistan t20 world cup: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीच्या घणाघाती खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्याचा बदला भारतानं यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात घेतला.

 

virat shopping
मेलबर्न: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीच्या घणाघाती खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्याचा बदला भारतानं यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात घेतला. ४ बाद ३१ अशा बिकट अवस्थेतून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी सामना अक्षरश: खेचून आणला. त्यांच्या खेळींमुळे भारतानं अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवला.

पाकिस्ताननं दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ मोठ्या अडचणीत सापडला. पहिल्या ३७ चेंडूंत केवळ ३१ धावा निघाल्या आणि ४ गडी माघारी परतले होते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत कोहलीनं हार्दिक पांड्याच्या मदतीनं डाव सावरला. एका बाजूला आवश्यक धावगती वाढत असताना कोहली आणि पांड्या हळूहळू धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होते. अखेरच्या षटकांमध्ये कोहलीनं गियर बदलला आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांवर घणाघाती हल्ला चढवला. कोहलीच्या झंझावातापुढे पाकिस्तानी गोलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले.

आजपासून देशात दिवाळीला सुरुवात झाली. काल रविवार असल्यानं देशभरात दिवाळीची शॉपिंग जोरात होती. मात्र कोहलीचा करिश्मा इतका की शॉपिंगदेखील थांबली. मॅक्स लाईफचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मिहिर वोरा यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी काल सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान देशभरात झालेल्या यूपीआय व्यवहारांची आकडेवारी दिली आहे.
फ्री हिटवर बोल्ड झाल्यावर विराटनं ३ धावा काढल्या; पाकिस्ताननं वाद घातला; नियम काय सांगतो?
भारत वि. पाकिस्तान सुरू झाल्यानंतर देशभरातील यूपीआय व्यवहार कमी होण्यास सुरुवात झाली. भारताची फलंदाजी सुरुवात झाल्यानंतरही हाच ट्रेंड पाहायला मिळाला. विराट आणि पांड्याची जोडी जमल्यावर तर यूपीआय व्यवहार आणखी कमी होऊ लागले. ते थेट उणे २० टक्क्यांपर्यंत घसरले. विराटनं भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिल्यानंतर भारतीयांनी जल्लोष केला आणि पुन्हा एकदा शॉपिंगला सुरुवात झाली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here