पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर वादग्रस्त शब्दांत टीका करुन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आता जाधव यांना पुणे न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी हा आदेश दिला.

कुडाळ येथील आमदार वैभव नाईक यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरु केली आहे. त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात काढलेल्या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाषण करताना नारायण राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांवर वादग्रस्त शब्दांत टीका केली होती. त्यावर पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने भास्कर जाधव यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्ये करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण करुन त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करण्यास चिथावणी दिल्याची फिर्याद डेक्कन पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पराभवाच्या नामुष्कीपेक्षा माघार बरी, जॉन्सन यांच्या निर्णयाचा लाभ कुणाला? सुनक इतिहास रचणार?
या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी भास्कर जाधव यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. हितेश सोनार व अॅड. संदीप जाधव यांनी भास्कर जाधव यांची बाजू मांडली. भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर वैयक्तिक टीका केली असून, कोणताही समाज, जात, धर्माविरोधात टीका केलेली नाही. केवळ भास्कर जाधव यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटी कलमे लावून राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला जात आहे, असा युक्तिवाद जाधव यांच्या वतीने अॅड. ठोंबरे यांनी केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने भास्कर जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दिवाळीच्या तोंडावर कंपनीचा मोठा निर्णय; तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना नारळ देणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here