नाशिक : हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला पालकमंत्री दादा भुसे यांनी धाडस करत पकडल्याची घटना मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात घडली असून पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे बंगल्यातील ३ महिलांचा जीव वाचला आहे. दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे बंगल्यात मोठ्या प्रमाणात दागिने, रोख रक्कम असेल ती लुटण्यासाठी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक चोरटा हातात पिस्तूल घेऊन दोषी यांच्या बंगल्यात घुसला आणि त्याने घरातील महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून दागिने मागितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.

शंभूराज देसाई यांची भीमप्रतिज्ञा; राष्ट्रवादीला पुढील १५ वर्षे आम्ही सत्तेत येऊ देणार नाही
त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक गोळा झाले आणि त्याच भागात पालकमंत्री दादा भुसे देखील आलेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट बंगल्याकडे धाव घेतली आणि चोरट्याला शरण येण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तासानंतर लपलेला चोरटा शरण आला त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं.

लक्षात ठेवा तेव्हा तुम्ही चुकून जिंकला होता; दुबई पराभवानंतर ३६४व्या दिवशी दिला पाकला दणका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here