uttar pradesh news: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये GRPच्या दोन जवानांनी एका दलित तरुणाला चालत्या ट्रेनमधून खाली फेकलं. या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कृष्ण कुमार सिंह आणि आलोक कुमार पांडे यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही GRPमध्ये जवान म्हणून कार्यरत होते.

 

railway
प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये GRPच्या दोन जवानांनी एका दलित तरुणाला चालत्या ट्रेनमधून खाली फेकलं. या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कृष्ण कुमार सिंह आणि आलोक कुमार पांडे यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही GRPमध्ये जवान म्हणून कार्यरत होते.

झारखंडचे रहिवासी असलेले अरुण भुईया दिवाळीसाठी त्यांच्या मित्रांसोबत घरी परतत होते. २० ऑक्टोबरला प्रयागराजमधील छिवकी रेल्वे स्थानकाच्या आसपास तिकिटावरून वाद झाला. त्यानंतर GRP जवानांनी अरुण यांना धावत्या ट्रेनमधून खाली ढकललं. घटनेनंतर प्रवाशांनी गोंधळ घातला. अरुण यांच्या मित्रांनी GRP जवानांविरोधात एफआयआर नोंदवला. पोलिसांनी दोन्ही जवानांविरोधात एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
हुंडा न मिळाल्यानं पतीनं दुसरा संसार थाटला; त्यानंतर पहिल्या पत्नीसोबत अकल्पित प्रकार घडला
दोन्ही आरोपींना वाराणसी न्यायालयात हजर करण्यात आलं. GRPचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ मीणा यांनी दोन्ही जवानांना निलंबित केलं आहे. अरुण मुंबईत कामाला होते. मित्र अर्जुन भुईया आणि हरिसोबत ते ट्रेननं गावी परतत होते. अर्जुन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते स्टेशनला पोहोचले त्यावेळी ट्रेन सुटली होती. त्यामुळे त्यांना ट्रेनमध्ये विनातिकीट चढावं लागलं. टीटीई आले तेव्हा त्यांनी तिकीट काढलं.
ओले टॉवेल घेऊन कुठे चालला रे? कस्टमच्या अधिकाऱ्याच्या प्रश्नानं बोबडी वळली; प्रवाशाला बेड्या
२० ऑक्टोबरला ट्रेन छिवकी रेल्वे स्थानकात पोहोचली. ट्रेननं स्थानक सोडताच दोन GRP बोगीत येऊन तिकीट तपासू लागले. आम्ही त्यांना तिकीट दाखवलं. मात्र ते योग्य नसल्याचं जवानांनी सांगितलं आणि धक्काबुक्की करु लागले. त्यांनी अरुण यांना मारहाण केली आणि धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं. अरुण यांच्याकडून जवानांनी २०० रुपये घेतल्याचा आरोपही अर्जुन यांनी केला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here