मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत एका २८ वर्षीय तरुणाकडे पाहिल्याच्या रागातून झालेल्या भांडणात तीन जणांनी एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. रोनित भालेकर असं मृताचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, पीडित रोनित भालेकर हा घटनेच्या वेळी मित्रासोबत मद्यधुंद अवस्थेत होता. ही घटना काल रविवारी पहाटे माटुंगा परिसरातील एका रेस्टॉरंटजवळ घडली, त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. रोनित भालेकर हा कॉल सेंटरमध्ये काम करायचा.

‘सबका नंबर आएगा’; भारत-पाकिस्तानच्या सामन्यातून अन्य संघांना मिळाले हे ३ धडे!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेकर याचे तीन आरोपींपैकी एकाकडे पाहण्यावरुन भांडण झाले होते. यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला जोरदार मारहाण केली. या मारहाणीत भालेकर जागेवरच बेशुद्ध झाला. यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपींना रविवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

Muhurat Day Market : सेन्सेक्समध्ये उसळी तर निफ्टी १७७०० च्या पार; ऊर्जा, वित्त कंपन्यांची दिवाळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here