रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत कधीच कोणते निर्णय घेतले नाहीत. अडीच वर्षात ते मंत्रालयात केवळ दोन तीन वेळा आले. कोकणावर मोठे संकट आले. चक्रीवादळ आले. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे सुद्धा आले नाहीत. पण राष्वादीचे अध्यक्ष शरद पवार या वयातही येथे आले आणि पाहणी केली. पण आज मला आनंद झाला. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांना अभ्यास किती आहे माहिती नाही, पण अजून परतीचा पाऊस सुरू आहे. पंचनामे झाले नाहीत तोपर्यंत मदत कशी देणार, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला. पंचनामे झाल्याशिवाय मदत देता येत नाही अशी टीका कदम यांनी केली.
या सरकारने तीन महिन्यात जवळपास चारशे निर्णय घेतले दिवाळीत काही ठिकाणी आनंदाचे वाटप पोहोचू शकले नसेल, पण साठ ते सत्तर टक्के लोकांपर्यंत केवळ शंभर रुपयात पोचले. जे तुम्हाला जमले नाही ते या सरकारने करून दखवले. जे चांगल आहे ते चांगल म्हणायची दानत ठेवली पाहिजे. पण उद्धव ठाकरे अतिशय दुःखी आहेत. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे त्यांच्या भावना महाराष्ट्राला कळतात, अशी बोचरी टीका कदम यांनी केली.
…म्हणून मी दिवाळी शक्यतो साजरी करत नाही- रामदास कदम
राज्यातील शेतकरीबांधवांसमोर उभा असलेला दुःखाचा डोंगर व आदिवासी बांधवांचे प्रश्न, त्यांचे राहणीमान हे सगळे दुःख आहे. त्यामुळे मी शक्यतो दिवाळी कधी साजरी करत नाही, असेही रामदास कदम यांनी यावेळी सांगितले.