पंढरपूरातील दिवाळी

दिवाळीसाठी प्रत्येकजण ठेवणीतले आणि नवीन कपड्यात सजत असतो अगदी तसेच लाडक्या विठूरायालाही दिवाळीसाठी अनमोल मौल्यवान दागिन्यात सजविण्यात येत असते.
लक्ष्मी पूजन निमित्त

लक्ष्मी पूजन निमित्त विठुरायाला हिरेजडित मुकुट, कानात सुवर्ण मत्स्यजोड, कापली हिऱ्यांचा नाम, कंठी मौल्यवान कौस्तुभ मणी, दंडाला हिऱ्यांच्या दंडपेट्या, मनगटी हिऱ्याचे कंगन जोड, गळ्यात नावरत्नांचा हार, हिऱ्यांचा लफ्फा, पानाड्याचा सुवर्ण हार, मोर मंडळी, सोन्याच्या बोरमाळा आणि तुळशीमाळा, सुवर्ण पुतळ्यांच्या माळा व पायात हिऱ्यांचे पैंजण अशा अनोख्या दागिन्याने सजविण्यात आले.
एक तासाचा अवधी

विठूरायाचा हा पोशाख करण्यासाठी एक तासाचा अवधी लागतो.
रुक्मिणी माता

विठुराया प्रमाणे रुक्मिणी मातेलाही सुवर्ण मुकुट , जडावाचे हार , नावरत्नांचा हार , खड्यांची वेणी , पाचूची गरसोळी , चिंचपेटी , तन्मणी , आणि हिर्या मणक्यांच्या विविध प्रकारचे हार रुक्मिणी मातेला परिधान करण्यात आले आहेत .
खास दिवाळीचा पोशाख

खास दिवाळीचा पोशाख करताना विठुरायाला १९ तर रुक्मिणी मातेला २३ प्रकारच्या मौल्यवान दागिन्यात मढविण्यात आले आहे.