Solapur local news | रविवारी २३ सप्टेंबर रोजी घरी दोघेच होते. आकाशने बापाला खूप दारु प्यायला दिली .जेवण करून झोपल्यानंतर आकाशने मध्यरात्री फरशी त्यांच्या डोक्यात घातली. त्यात बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांना ठार करून आकाश रात्रभर मयत बसवराज यांच्याजवळच झोपी गेला होता. सोमवारी २४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आकाश उठला आणि त्याने ठेकेदाराकडून ६०० रुपये उसने घेतले आणि त्याने थेट रेल्वे स्टेशन गाठले.

हायलाइट्स:
- बसवराज गवंडी यांना दारूचे व्यसन होते.
- दोघेही व्यसनी होते
दोघेही बांधकाम मजूर
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपी आकाश गवंडी व त्याचे वडील बसवराज गवंडी हे दोघेही ठेकेदाराकडे मिस्त्री म्हणजेच बांधकाम मजूर म्हणून कामाला जात होते. मयत बसवराज यांना दारूचे व्यसन होते. संशयीत आकाश हा देखील मद्यपान करत होता.दोघेही व्यसनी होते,पण मयत हा बसवराज गवंडी हा व्यसनाधीन झाला होता. दारू पिऊन कुटुंबातील सर्व सदस्यांना त्रास देत होता.
बापाला शेवटची दारु पाजली
रविवारी २३ सप्टेंबर रोजी घरी दोघेच होते. आकाशने बापाला खूप दारु प्यायला दिली .जेवण करून झोपल्यानंतर आकाशने मध्यरात्री फरशी त्यांच्या डोक्यात घातली. त्यात बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांना ठार करून आकाश रात्रभर मयत बसवराज यांच्याजवळच झोपी गेला होता. सोमवारी २४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आकाश उठला आणि त्याने ठेकेदाराकडून ६०० रुपये उसने घेतले आणि त्याने थेट रेल्वे स्टेशन गाठले.
हुबळी एक्सप्रेस मधून तो पळून जाणार होता; पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या
आकाश गवंडी हा सोलापूर रेल्वे स्थानकवरून हुबळी एक्स्प्रेसमधून विजयपूरला जाण्याच्या तयारीत होता. त्याने तिकीट देखील काढले आणि रेल्वेत जाऊन बसला.खुनाची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आकाशला रेल्वे सुटण्यापूर्वीच ताब्यात घेतले.तपासासाठी ताब्यात घेतले.सोमवारी दिवसभर तपास करून रात्री उशिरा गुन्हा नोंद केला.
मोबाईल फोनमुळे फसला
आकाश गवंडी हा वडिलांचा खून करून विजयपूरला पळून जाण्याच्या तयारीत होता.पळून जाण्यासाठी आकाश हा हुबळी एक्स्प्रेसमध्ये बसला होता. वडिलांचा मोबाइल घेऊन तो निघाला होता. पोलिसांनी ‘सायबर सेल’ च्या मदतीने त्याचे लोकेशन तपासले. रेल्वे स्टेशनवर तो असल्याची खात्री होताच एमआयडीसी पोलीस व शहर गुन्हे शाखेचे पथक तात्काळ त्याठिकाणी पोहचले. ट्रेन सुटायला अवघे काही मिनिटे शिल्लक असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दिवाळीसाठी मयताची पत्नी व दुसरा मुलगा हे मामाकडे गेले होते.सकाळी घरी परतल्यावर रक्ताच्या थारोळ्यात बसवराज गवंडी हे निपचित पडले होते.त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क केला व खुनाचा उलगडला झाला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.