Maharashtra Politics: दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले, दगडाला शेवटपर्यंत पाझर फुटलाच नाही. पक्ष नेतृत्वावर बोलताना मनाला वेदना होत आहेत. पण दगडाला पाझर फुटला नाही म्हणूनच ५० आमदार फुटले हेच सत्य असल्याचे केसरकर यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंना तेव्हा पाझर फुटला असता, शिवसैनिकांना साध्या भेटी दिल्या असत्या, जनतेची गाऱ्हाणी समजून घेतली असती तर पक्षामध्ये बंड का झालं असतं का ?

हायलाइट्स:
- सर्व मिटवूया, सर्वांनी एकत्र येऊया असे आम्ही सांगत होतो
- आमची दुःख आमच्या हृदयात आहेत
- ती सांगून आम्हाला मतं मिळवायची नाहीत
ज्यावेळी वीस आमदार आले आणि हे सर्व मिटवूया, सर्वांनी एकत्र येऊया असे सांगत असताना कोण सांगत होतं की तुम्हीही त्यांच्याबरोबर निघून जा ? त्यावेळी पाझर का नाही फुटला ? बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना कुठेतरी अडचणी येणार हे माहीत असूनही आमदारांना जा म्हणणं याला काय म्हणायचं ? हा देखील प्रश्न आहे. आम्ही कुणावर टीका करत नाही. आमची दुःख आमच्या हृदयात आहेत. ती सांगून आम्हाला मतं मिळवायची नाहीत. आमच्या कामावर आम्हाला मतं मिळवायची आहेत. ते आम्ही करून दाखवू. अडीच वर्ष तुम्हाला लोकांनी संधी दिली. आता अडीच वर्षात आम्ही काय करतो ते बघा आणि नंतर लोक काय म्हणतात ते ऐका. केवळ लोकांना भडकवल्याने सरकार चालत नसते, त्याने जनतेचे कल्याण होत नसते. त्यासाठी दिवसरात्र काम करावे लागते, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.
शिंदे- फडणवीस सरकारने बदलले ठाकरे सरकारचे ६ निर्णय
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सीबीआयला राज्यातील घडामोडींचा तपास आणि एफआयआर नोंदवण्यास सर्वसाधारण मान्यता दिली आहे. यासह, शिंदे सरकारने मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या किमान अर्धा डझन निर्णयांना स्थगिती दिली आहे किंवा ते रद्द केले आहेत. नवीन सरकार सत्तेवर येताच आधीच्या सरकारचे निर्णय बदलते, असा ट्रेंड महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.