मुंबई : अनेक घडामोडी आणि बातम्यांच्या आधारावर आज बाजारात कोणत्या शेअर्सकडे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. अशा शेअर्सची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने चेन्नई पेट्रोलियम (Chennai Petroleum), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक, डीएलएफ (DLF), येस बँक(Yes Bank), इंद्रप्रस्थ गॅस, आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank), बोरोसिल रिन्युएबल्स,आयडीबीआय बँक(IDBI Bank) आदी शेअर्सचा सामावेश असणार आहे.

चेन्नई पेट्रोलियम (Chennai Petroleum)
चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन आज सप्टेंबर २०२२ तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

Muhurat Day Market : सेन्सेक्समध्ये उसळी तर निफ्टी १७७०० च्या पार; ऊर्जा, वित्त कंपन्यांची दिवाळी
रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)
कंपनीने सप्टेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात घट नोंदवली. परंतू उद्योग समुहातील तेल ते रसायन व्यवसायाचा एकत्रित महसूल या तिमाहीत ३२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून १.५९ लाख कोटी रुपये झाला.

आयसीआयसीआय (ICICI Bank)
बँकेच्या सप्टेंबर तिमाहीत एकत्रित नफ्यात ३१.४३ टक्क्यांनी वाढ होऊन ८,००७ कोटी रुपये इतका झाला.

अंबानींच्या RILच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ, दिवाळीपूर्वीच गुंतवणूकदारांचं नशिब उजळलं
कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
बँकेने निव्वळ नफा २७ टक्क्यांनी नोंदवला हा नफा २,५८१ कोटी झाला आहे.

डीएलएफ (DLF)
कंपनीची विक्री बुकिंग एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत ६२ टक्क्यांनी वाढून ४,०९२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीने केलेल्या गुंतवणूकदारांच्या सादरीकरणानुसार, मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत त्याची विक्री बुकिंग रु. २,५२६ कोटी होती.

येस बँक(Yes Bank)
बँकेने सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात ३२ टक्क्यांनी घट नोंदवली आहे. बँकेच्या प्रोविजन्समध्येही वाढ झाली आहे.

गुंतवणूकदार करतील भरपूर कमाई, ‘या’ आठवड्यात ५ कंपन्याची एक्स-डिव्हिडंड डेट, जाणून घ्या
इंद्रप्रस्थ गॅस (Indraprastha Gas)
कंपनी राजधानी दिल्ली आणि लगतच्या भागात CNG स्वयंपाकाच्या गॅसची किरकोळ विक्री करते. गॅस वितरकाने सप्टेंबर तिमाहीच्या निव्वळ नफ्यात ४ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये निव्वळ नफा रु. ४१६.१५ कोटी होता, जो मागील वर्षी याच कालावधीत ४००.५४ कोटी होता.

रूट मोबाइल (Route Mobile)
कंपनीने ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत करानंतर एकत्रित नफ्यात ७४.५ टक्क्यांनी वाढ करून ७३.६ कोटी रुपयांची नोंद केली आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank)
बँकेने सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीत ५५६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात २६६ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने १५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

बिर्लासॉफ्ट (Birlasoft)
स्मॉलकॅप आयटी कंपनीने ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ११.६ टक्क्यांनी वाढ करून ११५ कोटींच्या नफ्याची नोंद केली आहे.

बोरोसिल रिन्युएबल्स (Borosil Renewables)
भारतातील पहिल्या सौर काच उत्पादकाने युरोपातील सर्वात मोठ्या सौर काच उत्पादक इंटरफ्लोट ग्रुपमधील ८६ टक्के भागभांडवल विकत घेतले आहे. इंटरफ्लोट ग्रुपच्या संपादनामुळे, बोरोसिल रिन्युएबल्सच्या सौर काच उत्पादन क्षमता सध्याच्या ४५० टन प्रतिदिन वरून ७५० टन प्रतिदिन होईल.

आयडीबीआय बँक(IDBI Bank)
बँकेने सप्टेंबरच्या तिमाहीत निव्वळ उत्पन्नात ४६ टक्के वाढ नोंदवली असून ती आता ८२८ कोटी रुपये झाली आहे.

गरवारे टेक्निकल फायबर्स (Garware Technical Fibres)
कंपनीने सप्टेंबर तिमाहीत नफ्यात १६.८ टक्के वाढ नोंदवली असून तो ४७.७ कोटी रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here