ऑस्ट्रेलिया: टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत टी-२० विश्वचषकातील मोहिमेला विजयी सुरुवात केली. भारतीय संघ सुपर १२ च्या गट २ मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड आणि झिम्बाब्वेसह आहे. पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना जिंकून टीम इंडिया अव्वल स्थानावर आली आहे. पण बांगलादेशमुळे भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

टी-२० विश्वचषकातील गट २ मधाल दुसरा सामना बांगलादेश विरूध्द नेदरलँड्स यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना फार अटीतटीचा झाला, नेदरलँड्सचा संघ शेवटपर्यंत लढत राहिला पण अखेरीस बांग्लादेशच्या संघाने बाजी मारला. या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नेदरलँड्सचा ९ धावांनी पराभव केला. बांगलादेशच्या या विजयासह भारतीय संघाला गुणतालिकेत नुकसान झाले आहे.

वाचा: अश्विनचं डोकं म्हणजे सुपरफास्ट! कोहलीही झाला फॅन, शेवटच्या चेंडूपूर्वी काय घडले पाहा

गटाबद्दल बोलायचे तर, फक्त भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्सचे सामने झाले आहेत. गटातील तिसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवला तर ते गटातही अव्वल स्थानावर येण्याची शक्यता होती. पण दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेमधील सतत सुरु असलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. सध्या बांगलादेशने नेदरलँड्सचा पराभव करून अव्वल स्थान पटकावले असून भारतीय संघाला दुसऱ्या क्रमांकावर घसरावे लागले आहे.

ICC Points Table

पॉइंट टेबलची स्थिती

बांगलादेशने सुपर १२ च्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करून २ गुण मिळवले आहेत. दुसरीकडे, त्यांची नेट रनरेट +०.४५० आहे, तर दुसरीकडे टीम इंडियानेही पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर २ गुण मिळवले आणि त्यांचा नेट रनरेट +०.०५० आहे. पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान सध्या पाचव्या तर नेदरलँड सहाव्या स्थानावर आहे. भारतीय संघ आता आपला दुसरा सामना २७ ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.

वाचा: अर्ध्या गावची खबर ठेवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्यांची बोंबाबोंब; जगभरात इज्जत काढून घेतली

जर आपण सुपर १२ फेरीच्या सामन्यांबद्दल बोललो, तर गट १ आणि गट २ मध्ये ६-६ संघ आहेत. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर सर्व संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. अशा प्रकारे सुपर १२ मध्ये प्रत्येक संघाला ५-५ सामने खेळायचे आहेत. या फेरीत दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यामुळेच या फेरीत संघाचे स्थान अधिक महत्त्वाची ठरते. ५ पैकी ३ किंवा ४ सामने जिंकूनही तुम्ही उपांत्य फेरीत प्रवेश करू शकणार नाहीत,अशी ही वेळ या सामन्यात येते. त्यामुळे या फॉरमॅटमधील प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here