मुंबई : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने शेअर बाजारात सोमवारी, २४ ऑक्टोबर रोजी एक तासाचे मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडले. तर अमेरिकन शेअर बाजार निर्धारित वेळेनुसार खुला राहिला. शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक तेजीत होते, पण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची मालमत्ता २.०२ अब्ज डॉलरने कमी झाली. सोमवारी, मस्कची कंपनी टेस्लाचे शेअर्स १.४९ टक्क्यांनी घसरून २११.२५ डॉलरवर बंद झाले. त्याच वेळी, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी, अंबानी ते लॅरी एलिसन यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

शेअर बाजारात सातत्याने वाढ! सेन्सेक्स ६०,००० पार तर निफ्टीत ७७ अंकांची वाढ
सोमवारी अमेरिकन शेअर बाजारात उत्साह असूनही एलोन मस्क यांना २.०२ अब्ज डॉलरचा फटका बसला. आता त्यांची एकूण संपत्ती २०२ अब्ज डॉलर झाली आहे. त्याच वेळी, दिवाळीच्या दिवशी जेफ बेझोसची संपत्ती ५७३ डॉलर दशलक्षने वाढून १३६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तसेच बर्नार्ड अर्नॉल्ट यांनीही लक्ष्मीपूजनच्या दिवशी ६९६ डॉलर दशलक्ष कमावले आणि आता त्यांची संपत्ती १३६ बिलियन डॉलर झाली आहे. दुसरीकडे, भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत सोमवारी म्हणजेच दिवाळीत ४२८ दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली. सध्या अदानी १२३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहे.

दिवाळीच्या तोंडावर कंपनीचा मोठा निर्णय; तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना नारळ देणार
अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस
दिवाळीचे महत्त्व भारतीयांसाठी असले तरी सोमवारी बिल गेट्स, वॉरेन बफेट, लॅरी पेज, सर्जी ब्रिन, स्टीव्ह वोल्मर यांसारख्या अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस पडला. त्यांची संपत्ती प्रत्येकी एक अब्ज डॉलर्सनी वाढली.

सेबीची कारवाई; अब्जाधीश वाडिया कुटुंबावर २ वर्षांची बंदी, कोटींचा दंडही ठोठावला; नेमकं प्रकरण काय?
भारतीय अब्जाधीशांची संपत्तीही वाढली
दरम्यान भारतीय अब्जाधीशांबद्दल बोलायचे झाले तर मुकेश अंबानी आणि अदानी यांच्याशिवाय शिव नाडर, अझीम प्रेमजी, राधाकृष्ण दमानी, लक्ष्मी मित्तल, दिलीप सांघवी आणि सायरस पूनावाला यांसारख्या टॉप-१० भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. दिवाळीच्या दिवशी मुकेश अंबानींच्या संपत्तीत २८४ दशलक्ष डॉलरची वाढ झाली, तर शिव नाडर यांनी ८७.५ दशलक्ष डॉलरची कमाई केली. याशिवाय अझीम प्रेमजी यांनी ८९ तर राधाकृष्ण दमानी यांनी ६७ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्तची कमाई केली.

अदानींवर लक्ष्मी माताची कृपा
वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर लक्ष्मीच्या आशीर्वादांचा वर्षाव झाला आहे. या वर्षी अदानींनी केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्व अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक संपत्ती कमावली आहे. त्यांनी या वर्षात आतापर्यंत सुमारे ४७ अब्ज डॉलर्सची संपत्ती खिशात घातली आहे. त्याचवेळी मुकेश अंबानी यांना या वर्षी ५.१ अब्ज डॉलर, तर शिव नाडर यांना ८.३६ बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. अझीम प्रेमजी यांच्या संपत्तीत १७.८ अब्ज डॉलरची घट झाली आहे. राधाकृष्ण दमानी आणि लक्ष्मी मित्तल यांच्या प्रत्येकी ४ अब्ज डॉलर्सच्या मालमत्ताही घटली आहे.

मुहूर्त ट्रेडिंग
दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. बीएसईचा सेन्सेक्स ४९७ अंकांच्या मोठ्या वाढीसह ५९,८०४ अंकांवर उघडला. व्यवहाराच्या सत्रात सेन्सेक्समध्येही चांगली वाढ दिसून आली. सेन्सेक्स ६० हजाराच्या अगदी जवळ पोहोचला. दुसरीकडे, सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २८ समभाग हिरव्या चिन्हावर आणि २ समभाग लाल चिन्हावर बंद झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here