मुंबई : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आणि संवत २०७९ चे पहिले पूर्ण ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला आहे. बँकिंग समभागांमध्ये गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक तेजीत उघडले. अमेरिकी शेअर बाजारातील तेजीनंतर आजही देशांतर्गत शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. बीएसईचा मुख्य संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स १७१ अंकांच्या उसळीसह ६०,००२ च्या पातळीवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १७,८०८ च्या पातळीवर उघडला.

सेक्टरची स्थिती
ऑटो, आयटी, फार्मा, मेटल, इन्फ्रा क्षेत्रांच्या समभागात तेजी दिसत आहेत, तर बँकिंग, मीडिया, एफएमसीजी, तेल आणि वायू आणि ग्राहक टिकाऊ वस्तू यांसारखी क्षेत्रे घसरत आहेत. आज बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रातील शेअर्सही घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Stocks to Watch Today: आज दमदार कमाईसाठी या शेअर्सवर असेल गुंतवणूकदारांची नजर
कोणत्या शेअर्समध्ये वाढ
आजच्या ट्रेडिंग सत्रात वधारलेल्या समभागांवर नजर टाकल्यास, जेएसडब्ल्यू स्टील २.१० टक्के, मारुती सुझुकी २ टक्के, टाटा मोटर्स १.९३ टक्के, आयशर मोटर्स १.६७ टक्के, डॉ. रेड्डी १.४३ टक्के, सिप्ला १.१७ टक्के, एसबीआय लाइफ इन्शुरन्स १.०६ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.९६ टक्के, सन फार्मा ०.९५ टक्क्यांनी तेजीने व्यवहार करत आहे.

गुंतवणूकदार करतील भरपूर कमाई, ‘या’ आठवड्यात ५ कंपन्याची एक्स-डिव्हिडंड डेट, जाणून घ्या
कोणत्या शेअर्समध्ये घसरण
इंडसइंड बँक १.७६ टक्के, यूपीएल १.५० टक्के, नेस्ले १.५६ टक्के, पॉवर ग्रिड १.५१ टक्के, एचयूएल १.०८ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.०८ टक्के, बजाज फायनान्स १.०६ टक्के, अॅक्सिस बँक १.०४ टक्के, Divi’s Lab ०.९५ टक्के, ब्रिटानिया ०.८४ टक्के, कोल इंडिया ०.६७ टक्के, एनटीपीसी ०.६० टक्के, बीपीसीएल ०.६० टक्के घसरत आहे.

गेल्या दिवाळीपासून अदानींच्या ३ कंपन्यांनी दिला मल्टिबॅगर परतावा, स्टॉकची नावं नोट करा!
दुसरीकडे, शुक्रवारपाठोपाठ सोमवारीही अमेरिकन शेअर बाजारांमध्ये चमक दिसून आली. वॉल स्ट्रीटचा मुख्य संवेदी निर्देशांक डाऊ जोन्स १.३४ टक्के म्हणजेच ४१७ अंकांनी वाढून ३१,४९९ वर बंद झाला. त्याचवेळी नॅस्डॅकही ०.८६ टक्क्यांनी वाढून १०,९५२ च्या पातळीवर बंद झाला. S&P देखील १.१९ टक्क्यांनी वाढून ३७९७ वर बंद झाला.

मुहूर्ताच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये उसळी
मुहूर्ताच्या व्यवहारात सेन्सेक्स ५२४ अंकांनी झेप घेत ५९,८३१ वर तर निफ्टी १५४ अंकांनी वर चढून १७७३० वर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे तर FMCG वगळता सर्व निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाले. निफ्टी बँक, नॉफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, पीएसयू बँक, खाजगी बँक यांसारखे क्षेत्रीय निर्देशांक १ टक्क्यांच्या वर बंद झाले. दरम्यान, बुधवारी (२६ ऑक्टोबर) दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here