वाचाः
ठाणे जिल्ह्यातील चार महापालिका आयुक्तांची बदली केली. त्याचवेळी तत्कालिन आयुक्त मिसाळ यांची पण बदली झाली होती. मग पुन्हा दोन दिवसांत बदली रद्द झाली. आज पुन्हा मिसाळ यांची बदली होऊन नवीन आयुक्तपदी अभिजित बांगर यांची नियुक्ती झाली आहे. सगळे प्रयोग झाले असतील तर एकदा पालकमंत्री पण बदलून पाहा, असं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे नवी मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने अण्णासाहेब मिसाळ यांच्या जागी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, दोनचं दिवसांत प्रशासनाने हा आदेश मागे घेऊन अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीला स्थगिती दिली होती. आज पुन्हा सरकारने नवीन आदेश पारित करुन अभिजीत बांगर यांची नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
वाचाः
नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेले अभिजीत बांगर हे २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती होण्याआधी बांगर हे त्या पदावर होते. त्यानंतर महिनाभर त्यांच्याकडं कुठलाही कार्यभार नव्हता. सध्या ते नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times