आणखी वर जाईल शेअरचा भाव
दरम्यान, ब्रोकरेज फर्म एडलवाईसने आपल्या नोटमध्ये लिहिले की “ICICI बँकेने मजबूत उत्कृष्ट कामगिरी अहवाल जारी केला आहे. सप्टेंबर तिमाहीसाठी सर्वोत्तम दर्जाचे परफॉर्मर म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.” ब्रोकरेजनुसार, बँकेचे शेअर्स रु. १,११५ वर जाऊ शकतात. ब्रोकरेजने त्याला ‘बाय’ रेटिंग दिले आहे.
दुसरीकडे, ICICI बँकेने मजबूत क्रेडिट वाढ, बहु-तिमाही उच्च मार्जिन आणि कमी क्रेडिट खर्च यांच्या दरम्यान मजबूत 2QFY23 कामगिरी नोंदवली. कर्जामध्ये वार्षिक २२.७ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊसए ICICI बँकेला बाय रेटिंग देत प्रति शेअर रु. १,१४४ चे लक्ष्य ठेवले आहे.
सप्टेंबरमध्ये बँकेचा नफा
३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत आयसीआयसीआय बँकेचा एकत्रित निव्वळ नफा ३१.४३ टक्क्यांनी वाढून ८,००६.९९ कोटी रुपये होता. यापूर्वी बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार दुसऱ्या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न देखील ३१,०८८ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. त्याच वेळी, त्यांचा एकूण खर्चही वाढून १९,४०८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत १८,०२७ कोटी रुपये होता.
तसेच या कालावधीत बँकेच्या बुडीत कर्जाची आर्थिक तरतूद मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील २,७१३.४८ कोटी रुपयांच्या तुलनेत १,६४४.५२ कोटी रुपयांवर घसरली आहे. तसेच बँकेच्या ठेवी १२ टक्क्यांनी वाढून रु. १,०९०,००८ कोटींवर पोहोचल्या, तर अॅडव्हान्स २३ टक्क्यांनी वाढून ९३८,५६३ कोटी रुपयांवर पोहोचल्या.
खरेदी की विक्री, काय करावे?
आयसीआयसीआयने आठव्या तिमाहीत सर्वोत्कृष्ट दर्जाचे परफॉर्मर म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. तर एडलवाईसने ICICI बँकेच्या शेअर्सवर १,११५ रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह ‘बाय’ रेटिंगचा सल्ला दिला आहे.