मुंबई : आता तुम्ही शेअर्सप्रमाणे सोने खरेदी आणि विक्री करू शकता. मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE)ने दिवाळीच्या निमित्ताने सोन्याच्या इलेक्ट्रॉनिक पावत्या (EGR) लाँच केल्या आहेत. ट्रेडिंगसाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगळे खाते उघडण्याची गरज नाही.

कोण ट्रेडिंग करू शकतं
आतापर्यंत १२३ सदस्यांची नोंदणी झाली आहे. सोन्याच्या इलेक्ट्रॉनिक पावत्यांद्वारे (EGR), सर्व प्रकारचे बाजारातील सहभागी जसे की वैयक्तिक गुंतवणूकदार, आयातदार, बँका, रिफायनर्स, सराफा व्यापारी, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते सोने खरेदी आणि विक्री करू शकतील.

परदेशातून स्वस्त सोने खरेदीचा प्लॅन बनवताय तर आधी नियम जाणून घ्या, नाहीतर एक चूक महागात पडणार
किती ग्रॅमचे कॉन्ट्रॅक्ट
इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स १० ग्रॅम आणि १०० ग्रॅमचे कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात असतील. प्रति ग्राम किंमत स्क्रीनवर प्रदर्शित होईल. यामुळे सोने डिमॅट स्वरूपात साठवता येईल.

इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्या म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्या इतर सिक्युरिटीजसारख्याच असतात. त्याचे ट्रेडिंग क्लिअरिंग आणि सेटलमेंट देखील इतर सिक्युरिटीजप्रमाणे केले जाईल. सध्या, भारतात फक्त गोल्ड डेरिव्हेटिव्ह आणि गोल्ड ईटीएफचा व्यापार होतो, तर इतर देशांमध्ये सोन्याच्या प्रत्यक्ष व्यापारासाठी स्पॉट एक्सचेंज आहेत.

दिवाळी होईल खास; तुमच्या प्रिय व्यक्तीला सोन्याहून स्पेशल असं गिफ्ट द्या
एक रुपयात देखील सोन्याची खरेदी
दीपावलीच्या निमित्ताने सोने खरेदी केली जाते. पण तुम्हाला माहितीये का एक रुपयांतदेखील तुम्ही सोने खरेदी करू शकता. तुम्ही पेटीएम (Paytm) वर १ रुपयाचेही सोने खरेदी करू शकता. सोने खरेदीसाठी घराबाहेर पडण्याचीही गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कधीही, कुठेही १ रुपयात सोने खरेदी करू शकता.

सोनं खरेदीची संधी! BSE मधूनही करता येणार सोन्याचा व्यवहार, जाणून घ्या कसा घ्याल फायदा
एक रुपयात किती सोने मिळेल
तुम्ही Paytm वर १ रुपयाचे सोने (Gold) खरेदी केल्यास तुम्हाला ०.०००१ ग्रॅम सोने मिळेल. यावर तुम्हाला ३ टक्के जीएसटी (GST) जोडून १.०४ रुपये द्यावे लागतील. तुम्ही Paytm वरून १००१ रुपयांचे सोने खरेदी केले तर तुम्हाला ०.१९४४ ग्रॅम सोने मिळेल. तुम्हाला ३ टक्के जीएसटीसह १,०३१ रुपये भरावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here