नवी दिल्ली : भारतात असे फार कमी लोक असतील जे म्हणतील की मला करोडपती व्हायचे नाही. पैशाने सर्व सुख-सुविधा मिळू शकतात आणि म्हणूनच लोक पैसे कमावण्यासाठी कष्ट करायलाही तयार असतात. पण फक्त मेहनत पुरेशी नाही. त्यासाठी कठोर परिश्रमासोबतच स्मार्ट नियोजन करावे लागेल. तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उभारण्याचे ध्येय साध्य करू शकता पण नियोजनाने.

गुंतवणूकदारांना खासगी बँकेच्या शेअरची भुरळ, ३२ म्युच्युअल फंड हाऊसने लावला कोट्यवधींचा डाव
गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत लक्षणीय वाढ झाली आहे. म्युच्युअल फंड विविध कार्यकाळ आणि धोका पत्करण्यासाठी तयार असलेल्या गुंतवणूकदारांसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देते. त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणे देखील खूप सोपे आहे. तसेच, गुंतवणूकदारांना एका वेळी जास्त पैसे गुंतवावे लागत नाहीत. जवळपास सर्व म्युच्युअल फंड योजनांमध्ये SIP सुविधा उपलब्ध आहे, जे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अतिशय सोपी आणि सुलभ करते.

लार्ज कॅपपासून म्युच्युअल फंडात करा गुंतवणुकीचा श्रीगणेशा; कमी जोखिमेसह मिळतो भरघोस परतावा
तुम्हाला १५ x १५ x १५ चा नियम माहीत आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला या नियमाबद्दल सांगणार आहोत. शिस्तीने या नियमाचे पालन केल्यास तुम्ही करोडपती कसे होऊ शकता. लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड हे बाजाराशी निगडित आहेत, त्यामुळे तेथील चढ-उतार तुमच्या गुंतवणुकीवरही दिसून येतील. त्यामुळे शक्य असल्यास गुंतवणूक तज्ञाचा सल्ला घेतल्यानंतरच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.

फंडांचा फंडा; गृह-शैक्षणिक कर्जाचे हफ्ते सोपे करतील म्युच्युअल फंडांचे SIP
हा नियम काय आहे?
१५,००० रुपये, १५ वर्षांसाठी, १५% रिटर्नसह, हा १५*१५*१५ नियम आहे. निप्पॉन म्युच्युअल फंडानुसार यामध्ये चक्रवाढीला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही १५ वर्षे म्युच्युअल फंडात दरमहा १५ हजार रुपये गुंतवले आणि त्यावर तुम्हाला १५ टक्के परतावा मिळत असेल, तर ही रक्कम १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. ती आणखी १५ वर्षे वाढवली तर १० कोटी रुपये होऊ शकतात. तुम्ही म्युच्युअल फंडात १५ वर्षात रु. २७ लाख गुंतवाल आणि त्यावर तुम्हाला ७४ लाखांचा परतावा मिळेल, ज्यामुळे तुमचा एकूण निधी रु. १.०१ कोटी होईल.

जितक्या लवकर तितकं बरं
जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल तितके जास्त पैसे तुम्ही उभे करू शकाल. सेवानिवृत्तीनंतर तुम्ही आता जेवढा खर्च कराल त्याच्या ५०० ते ६०० पट जास्त लागेल. तरच तुम्ही निवृत्तीनंतर पैशाची चिंता न करता आरामदायी जीवन जगू शकाल. ते म्हणतात की जर तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला दर महिन्याला १ लाख रुपये म्युच्युअल फंडात गुंतवावे लागतील, त्यानंतर निवृत्तीनंतर तुमच्याकडे ४ ते ६ कोटी रुपयांचा निधी असेल. पण लवकर कमी गुंतवणूक करूनच ही रक्कम गाठली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here