Lok sabha Election 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी पक्षाच्या घटनेनुसार झाली. मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून, त्यामुळे काँग्रेसला उभारी मिळेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

हायलाइट्स:
- काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न
- काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी पक्षाच्या घटनेनुसार झाली
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेसंदर्भात भाष्य केले. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात येत आहे. ही पदयात्राच मोदींच्या पराभवाचे कारण ठरेल, असे चव्हाण यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी पक्षाच्या घटनेनुसार झाली. मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून, त्यामुळे काँग्रेसला उभारी मिळेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेसंदर्भात एक अपेक्षा व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांमधूनही काँग्रेसची भारत जोडो यात्रा जायला हवी होती, आपण ही निवडणूक सोडलेय, असा संदेश भाजपला जाता कामा नये, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते.
ठाकरे-पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिले होते. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.