मुंबई : देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शेअर्सने मंगळवारी सर्वकालीन उच्चांक गाठला. एसबीआयचे शेअर्स सकाळी १०च्या सुमारास ५७९.६० च्या पातळीवर पोहोचले, जे आतापर्यंतचे उच्चांक आहे. तर हे वृत्त लिहिपर्यंत बँकेचे शेअर १.३० टक्क्यांच्या वाढीसह ५७८ रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहेत. विशेष म्हणजे आज बाजारात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर एसबीआयच्या शेअर्समध्ये तेजी कायम आहे.

ICICI बँकेच्या स्टॉकवर खरेदीसाठी तुटून पडले गुंतवणूकदार, शेअर्सनी गाठला विक्रमी उच्चांक
गेल्या एका महिन्यात त्याच्या समभागांनी ५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. वाढता भांडवली खर्च, कर्जाची वाढती मागणी आणि कॉर्पोरेटची वाढती मागणी याचा फायदा एसबीआयला निःसंशयपणे मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या ८ ट्रेडिंग सत्रांमध्ये एसबीआयच्या शेअर्समध्ये सुमारे ११ टक्के वाढ झाली आहे.

Stocks to Watch Today: आज दमदार कमाईसाठी या शेअर्सवर असेल गुंतवणूकदारांची नजर
एसबीआय मजबूत स्थितीत
रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्सने ७ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले की एसबीआयच्या मालमत्तेच्या गुणवत्तेच्या मापदंडांमध्ये गेल्या तीन वर्षांत सातत्याने सुधारणा झाली आहे. तसेच, कोविड-१९ चा दबाव असूनही बँकेच्या बाजूने घसरण (वास्तविक मूल्य आणि अंदाजे मूल्य यांच्यातील फरक) कमी झाला आहे. बँकेच्या अंतर्गत भांडवल निर्मिती, पुरेशी भांडवल पातळी आणि मालमत्तेच्या गुणवत्तेला कोणताही धक्का बसू नये यासाठी योजनेला पाठिंबा दिला गेला आहे. बँकेचा किरकोळ व्यवसाय त्याच्या वाढीचे नेतृत्व करेल असा पतमानांकन एजन्सी फिचला विश्वास आहे.

अंबानींच्या RILच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ, दिवाळीपूर्वीच गुंतवणूकदारांचं नशिब उजळलं
पुढील महिन्यात बोर्डाची बैठक
एसबीआयच्या संचालक मंडळाची पुढील महिन्याच्या ५ तारखेला बैठक होणार आहे, ज्यामध्ये सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली जाईल. ICICI सिक्युरिटीजच्या मते आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक आधारावर बँकेच्या कर्जाची वाढ १७-१८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरला, तर पाच वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ असेल. याशिवाय ठेवींमध्ये १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज अंदाजे रु. ८,०००-९,००० कोटी आणि एकूण NPA रु. ६६०० कोटी असेल. तसेच बँकेला तिमाही दर तिमाही आधारावर ९२७० कोटी रुपयांचा नफा होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here