युनिलिव्हनं अनेक ब्रँड्सचे शॅम्पू बाजारातून माघारी बोलवण्याचा निर्णय घेतल्यानं वैयक्तिक काळजीसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमधील एयरोसोलबद्दल पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या दीड वर्षात अनेक एयरोसोल सनस्क्रिन्स बाजारातून माघारी बोलवण्यात आल्या. त्यात जॉन्सन अँड जॉन्सनच्या Neutrogena, Edgewell Personal Care Co.च्या Banana Boat आणि Beiersdorf AG’s च्या Coppertone चा समावेश आहे.
Home Maharashtra uniliver, मोठी बातमी! डव, ट्रेसमेमुळे कॅन्सरचा धोका; युनिलिव्हरनं अनेक उत्पादनं रिकॉल; बाजारात...
uniliver, मोठी बातमी! डव, ट्रेसमेमुळे कॅन्सरचा धोका; युनिलिव्हरनं अनेक उत्पादनं रिकॉल; बाजारात खळबळ – dove nexxus and other dry shampoos recalled for cancer causing chemical
मुंबई: जगप्रसिद्ध कंपनी युनिलिव्हरच्या अनेक शॅम्पू ब्रँड्समध्ये कर्करोग निर्माण करणारं केमिकल आढळून आलं आहे. कंपनीनं Dove, Nexxus, Suave, TIGI आणि TRESemmé एयरोसोल ड्राय शॅम्पू अमेरिकन बाजारातून परत मागवले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार यामध्ये बेंझिन सापडलं आहे. या केमिकलमुळे कर्करोग होऊ शकतो. ही उत्पादनं ऑक्टोबर २०२१ च्या आधी तयार करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिली. ही उत्पादनं संपूर्ण देशातील वितरकांकडे पाठवण्यात आली होती. यामध्ये Dove Dry Shampoo Volume and Fullness, Dove Dry Shampoo Fresh Coconut, Nexxus Dry Shampoo Refreshing Mist, Suave Professionals Dry Shampoo Refresh and Revive यांचा समावेश आहे.