कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. एका १५ फुटांच्या अजगरानं कुत्र्याला विळखा घातला. कुत्र्याला विळखा घालत अजगरानं त्याला संपवलं. त्यानंतर त्याला गिळू लागला. केंट परिसरात वास्तव्यास असलेल्या लेफ्टनंट कर्नलच्या घरात ही घटना घडली. ती पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले. त्यांनी संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद केली.

लोकांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. अजगराला पकडून जंगलात सोडण्यात आलं. घटना रविवारी घडल्याचं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं. लष्करी अधिकाऱ्याच्या घरात १५ फुटांचा अजगर शिरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही लगेचच घटनास्थळी पोहोचलो. मात्र आम्ही पोहोचण्याआधीच अजगरानं कुत्र्याला विळखा घालून संपवलं होतं, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
दारु प्यायला, पण नशा होईना; तरुणानं दारुमध्ये ऍसिड मिसळलं, शेवट भयंकर झाला
अजगराची सुटका करून त्याला जंगलात सोडण्यात आलं. काही दिवसांपूर्वी कानपूरमधल्याच एका अजगराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बकरीला गिळून झाल्यावर अजगर उन्हात निवांत बसला होता. चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठात अजगर आढळला होता. या अजगरानं बकरी गिळली होती. विभागाचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. अर्धा तास परिश्रम केल्यानंतर अजगर हाती लागला. यानंतर अजगराला प्राणी संग्रहालयातील सर्पघरात सोडण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here