वाचाः
वसईतील वालिव येथील क्वारंटाइन सेंटरमधील करोनारुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मनसे जिल्हा अध्यक्ष आणि अन्य तीन मनसे कार्यकर्ते महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र यावेळी आयुक्तांनी केवळ दोन कार्यकर्त्यांना प्रवेश द्यावा, असे सांगत त्यांना आतमध्ये येण्यास सांगितले. परंतु मनसे कार्यकर्ते चारही कार्यकर्त्यांना कार्यालयात प्रवेश हवा, यावर अडून बसल्याने आयुक्तांनी कोणालाही नंतर प्रवेश दिला नाही. प्रवेश नाकारल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी दालनाबाहेरच वालिव येथील क्वारंटाइन सेंटरमधील फोटो लावून आयुक्तांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच, आयुक्तांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचाः
विरार पोलिसांनी याप्रकरणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख वितेंद्र पाटील यांनी अटक करण्यात आली आहे. तर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून. पोलिसांनी या प्रकरणावर अधिक बोलणं टाळलं आहे. पोलिस आता मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक करतात का? हे आता पहावे लागणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी करोना रुग्णांच्या उपचारांसाठी तयार केलेल्या क्वारंटाइन सेंटरकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुग्णांनी केला होता. क्वारंटाइन सेंटरमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्यानं तिथला सगळा कारभार रामभरोसे चालत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या समस्येवर लगेचच तोडगा काढण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times