dead frog found inside sealed country liquor bottle: छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यात दारुच्या बाटलीत मेलेला बेडूक सापडला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हरदी बाजारातील देशी दारुच्या दुकानातून एका व्यक्तीनं दारु खरेदी केली. दारु घेऊन तो घरी पोहोचला. तेव्हा एका बाटलीत मेलेला बेडूक असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

 

frog
कोरबा: छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यात दारुच्या बाटलीत मेलेला बेडूक सापडला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हरदी बाजारातील देशी दारुच्या दुकानातून एका व्यक्तीनं दारु खरेदी केली. दारु घेऊन तो घरी पोहोचला. तेव्हा एका बाटलीत मेलेला बेडूक असल्याचं त्याच्या लक्षात आलं. बेडूक असलेली बाटली घेऊन ग्राहकानं दुकान गाठलं. तिथल्या सेल्समननं त्याला बाटली बदलून दिली. ग्राहक दुकानात पोहोचताच बेडूक असलेली बाटली पाहण्याासाठी लोकांची गर्दी जमली.

ग्राहक देशी दारुच्या तीन क्वार्टर खरेदी करुन घेऊ लागला होता. त्याला बाटलीत मेलेला बेडूक सापडला. ती बाटली घेऊन तो दुकानात आला. घाईघाईत तो दुकानातून बाटली घेऊन गेला होता, अशी माहिती सेल्समन अमित राठोड यांनी दिली. घरी गेल्यावर ग्राहक बाटली उघडायला गेला. तेव्हा त्याला बाटलीच्या आत बेडूक दिसला. ग्राहकानं आणखी काही जणांना घेऊन दारुचं दुकान गाठलं आणि बाटलीत मेलेला बेडूक आढळल्याचं सांगितलं.
अबब! १५ फूट लांबीच्या अजगरानं कुत्र्याला विळखा घातला; गिळू लागला अन् मग…
दारुचा बॉक्स गोदामातून येतो. तो स्कॅन करून त्यातील बाटल्या ग्राहकांना देण्यात येतो, असं राठोड म्हणाले. बाटलीत बेडूक सापडल्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. सील बंद बाटलीत मेलेला बेडूक आढळल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबद्दल मद्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मद्यप्रेमींनी केली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here