कोल्हापूर: महामंडळ नियुक्तीसाठी राज्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून ही नियुक्ती करताना भाजपला ५० टक्के आणि इतर सर्व मित्र पक्षांना निम्म्या जागा देण्याचा प्रस्ताव निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, नियोजन मंडळ तसेच जिल्हास्तरीय अशासकीय समित्यांमध्ये मात्र ज्या पक्षाचा आमदार त्याला ७० टक्के आणि इतरांना ३० टक्के संधी देण्यात येणार आहे. या महाराष्ट्र पातळीवरील प्रयोगाची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात येणार आहे.

राज्यात भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, जनसुराज्य सह इतर मित्र पक्षांची सत्ता येऊन तीन महिने उलटले. अजूनही सर्व पक्ष एकसंघ कारभार करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्या जिल्ह्यात या सर्व पक्षांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मने जुळालेली नसल्याने ती जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात भाजप, शिंदे गट आणि इतर सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात कोल्हापुरात करण्यात आली.

वाचा-

मंत्रिमंडळ विस्तारीला विस्ताराला वेळ लागणार असल्याने तातडीने महा महामंडळ आणि अशासकीय कमिट्यावर सदस्यांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्याच्या वाटपाचा फॉर्मुला तयार करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात ५० टक्के महामंडळे भाजपला तर इतर सर्व मित्र पक्षांना निम्म्या जागा देण्यात येणार आहेत. नियोजन मंडळ तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवर ज्या अशासकीय कमिट्या आहेत, त्यावर सदस्य नियुक्त करताना ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ७० टक्के आणि इतरांना ३० टक्के असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. यानुसार सर्व जिल्ह्यांची यादी तयार करण्यात येत आहेत. त्याची सुरुवात कोल्हापुरात करण्यात आली.

वाचा-

प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या पक्षाच्या दोन नेत्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वयाकडून राज्यांच्या नेत्याकडे नावे पाठवण्यात येणार आहेत. कोल्हापुरात मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, राजेंद्र यड्रावकर, राजेश क्षीरसागर, सुरेश हाळवणकर,अमल महाडिक, समीत कदम,प्रा.जयंत पाटील, यांच्यासह अनेक नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये विविध कमिट्याबाबत चर्चा झाली. याच पद्धतीने आता प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन नावे निश्चित करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here