महेश, दिलीप सुधीर यांचे फोटो व्हायरल झाल्याने वेगळीच चर्चा
सोलापुरातील मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले नेते महेश कोठे यांच्या घरी मंगळवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसमधून आलेले व सोलापूर शहर काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, शिंदे गटात प्रवेश करणारे दिलीप कोल्हे व महेश कोठे यांची एकत्रित बसून चर्चा झाली. या बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत खरी महिती समोर आली नाही. तिघे एकत्रित बसल्याचे फोटो सोलापुरात वायरल झाले आहे.
शरद पवार यांचे कट्टर समर्थक दिलीप कोल्हे यांनी जाहीर केले आहे, की सोलापुरातील मातब्बर नेत्यांना घेऊन शिंदे गटात जाणार आहे. त्यामुळे आता हे तिघे शिंदे गटात जाणार की काय अशी चर्चा देखील दबक्या आवाजात होत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून सोलापुरात शिंदे गटाचे महत्व वाढले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर पक्षातील नेते व कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत जात असल्याने याचा परिणाम थेट आगामी महानगरपालिका निवडणुकीत होणार आहे.
महेश कोठेंनी काढला चिमटा
महेश कोठें यांच्या राधाश्री या निवासस्थानी दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी मधील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित आले होते. राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी मुळे नाराज असलेले दिलीप कोल्हे हे देखील यावेळी उपस्थित होते.यावेळी महेश कोठेंनी माहिती देताना अप्रत्यक्षपणे चिमठा काढला ,आणि शहर अध्यक्ष पदाची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होते.येत्या काही दिवसांत नवीन अध्यक्ष।पदाची निवडणूक होईल,गटबाजी केल्याने पक्षाच नुकसान होईल असे सांगितले. महेश कोठेंनी हा इशारा दिलीप कोल्हे यांकडे केला का किंवा राष्ट्रवादीमधील पदाधिकऱ्यांवर केला हे अनेकांना समजले नाही.