जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवार २५ ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या या घटनेत चार जण जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय-२० रा. सिकलकर वाडा, तांबापुरा), असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून याच परिसरात राहणाऱ्या बावरी भावंडांसोबत संजयसिंग याचा वाद झाला होता. तर, याच वादातून त्याचा २५ तारखेच्या रात्री खून झाल्याची माहिती मिळाली आहे. (dispute over the bursting of firecrackers in jalgaon)

मयताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील सिकलकर वाडा भागात राहणाऱ्या संजयसिंग प्रदीपसिंग टाक या तरुणाचा सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून वाद झाला होता. आमच्या घरासमोर फटाके फोडू नये असा जाब विचारल्याने मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांच्यासोबत वाद झाला होता.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना डिवचले, म्हणाले…
या हल्ल्यात चौघे झाले जखमी

मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास संजयसिंग हा घराबाहेर क्रिकेटच्या गप्पा करीत असताना मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. संजयसिंग याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका बलवंतसिंग टाक, गल्लीतील व्यक्ती बग्गासिंग टाक यांनी धाव घेतली असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला. यात चौघे देखील जखमी झाले आहे.

दिवाळीच्या सणात सुन्न करणारी घटना! दोन वीज कर्मचारी विजेची तार जोडण्यासाठी गेले आणि होत्याचे नव्हते झाले
दोन्ही गटांकडून झाली दगडफेक

घटनास्थळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याची माहिती आहे. मयत आणि जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयीत फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी झालेल्या वादावर एमआयडीसी पोलिसांनी वेळीच दखल घेत कारवाई केली असती तर आजचा प्रकार घडला नसता अशीही चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.

खडसे समर्थक नगरसेवकांना दिलासा नाहीच, नगरविकास विभागाने याचिका फेटाळली; काय आहे प्रकरण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here